पुणे : खासगी सावकारने पावणेदोन लाखांच्या बदल्यात घेतले 6 लाख, एकर जमीन

पुणे : खासगी सावकारने पावणेदोन लाखांच्या बदल्यात घेतले 6 लाख, एकर जमीन

खेड-शिवापूर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : एक लाख 70 हजार रुपयांच्या बदल्यात 6 लाख रुपये व एक एकर शेती हडपणार्‍या खासगी सावकाराला राजगड पोलिसांनी अटक केली. याबाबत सतीश कृष्णा शिंदे (वय 54, रा. शिवापूर ता. हवेली) यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार आदिनाथ शंकर वाडकर आणि मंगल आदिनाथ वाडकर (रा. श्रीरामनगर, ता. हवेली) यांना पोलिसांनी अटक केली.

राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन 2016 पासून ते दि. 10 फेब—ुवारी 2020 पर्यंत कोंढणपूर फाटा येथे व फिर्यादीच्या घरी आदिनाथ व मंगल वाडकर यांनी शिंदे यांना दिलेल्या 1 लाख 70 हजार रुपयांच्या बदल्यात रोख 6 लाख रुपये घेतले. तसेच फिर्यादीच्या नावे असलेल्या मौजे खोपी (ता. भोर) येथील गट नं. 59 मधील 40 आर क्षेत्र हे त्यांचे नावे करून घेतले. आदिनाथ व मंगल वाडकर यांनी फिर्यादीची फसवणूक करून त्यास दमदाटी केली. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार राजगड पोलिसांनी सावकारी अधिनियानुसार गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे करीत आहेत.

खासगी सावकारी करणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्याच्या विळख्यात नागरिकांनी अडकू नये. याबाबत काही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा.

मनोज नवसरे,
सहायक पोलिस निरीक्षक, राजगड

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news