Prime Minister Narendra Modi: दिवाळीनिमित्त PM मोदी हिमाचल प्रदेशमध्‍ये जवानांच्या भेटीला

Prime Minister Narendra Modi:PM Modi in HP
Prime Minister Narendra Modi:PM Modi in HP
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: देशभरात दीपावली सणाला उत्‍साहात प्रारंभ झाला आहे. यंदाही नेहमीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी आपली दिवाळी अहाेरात्र देशसेवेसाठी कार्यरत असणार्‍या जवानांबराेबर साजरी केली. हिमाचल प्रदेlaZ[y लेपचा येथे आपल्या शूर सुरक्षा दलांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी पोहोचलो असल्याचे ट्विट त्‍यांनी केले आहे.  (Prime Minister Narendra Modi)

Prime Minister Narendra Modi: पंतप्रधानांकडून देशवासियांना शुभेच्छा

देशातील आमच्या सर्व कुटुंबियांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. हा सण सर्वांच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि अद्भुत आरोग्य घेऊन येवो, अशा शभेच्छा पीएम मोदी यांनी आपल्या सर्व देशवासियांना दिल्या आहेत. (Prime Minister Narendra Modi)

आतापर्यंत 'या' जवानांसोबत साजरी केली दिवाळी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये जगातील सर्वात उंच युद्धभूमी सियाचीन, २०१५ मध्ये पंजाबमधील अमृतसर आणि २०१६ मध्ये हिमाचल प्रदेशातील किन्नौर येथील सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली होती. २०१७ मध्ये जम्मू-काश्मीरमधील गुरेझ, २०१८ मध्ये उत्तराखंडमधील केदारनाथ आणि २०१९ मध्ये जम्मू विभागातील राजोरी येथे लष्कराच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. तर पंतप्रधानांनी २०२० मध्ये राजस्थानमधील जैसलमेरमध्ये, २०२१ मध्ये जम्मू विभागातील राजोरी जिल्ह्यातील नौशहरा येथे आणि २०२२ मध्ये लडाखच्या केंद्रशासित प्रदेशातील कारगिलमध्ये दिवाळी सण साजरी केली. दरम्यान सीमा आणि नियंत्रण रेषेवरील अविरत कार्यरत अनेक भारतीय जवानांना पीएम यांनी भेट घेत प्रेरणा दिली आहे.

भारतीय सैनिकांना प्रेरणा देणारी 'दिवाळी'

पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१४ पासून दरवर्षी आंतरराष्ट्रीय सीमा किंवा नियंत्रण रेषेवरील सैनिकांसोबत दिवाळी साजरी करतात. आतापर्यंत त्यांनी सियाचीन, खासा, सुमदो, गुरेझ व्हॅली, हरसिल, राजोरी, जैसलमेर, नौशेरा आणि कारगिलसह विविध ठिकाणी सैनिकांसोबत मिठाईचे वाटप करत दिवाळी सण साजरा केला आहे. सशस्त्र दलांसोबत दिवाळी साजरी करण्याची पंतप्रधान मोदींची ही परंपरा भारतीय सैनिकांना प्रेरणा देणारी आहे.

'दिवाळी' सण अन् प्रचंड बर्फवृष्टीतही सीमेवर जवान कार्यरत

जम्मू-काश्मीरमध्ये सध्या बर्फवृष्टी सुरू आहे. दरम्यान जम्मू-काश्मीर येथे ४ हजार फुट उंचीवर प्रचंड बर्फवृष्टी सुरू आहे. दरम्यान भारतीय जवान दिवाळी दरम्यान देखील पाकिस्तानच्या एलओसीवर गस्त घालताना दिसत आहेत. या संदर्भातील व्हिडिओ 'एएनआय'ने शेअर केला आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news