गोव्यातील ‘सी सर्व्हायव्हल’ केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उदघाटन

सी सर्व्हायव्हल
सी सर्व्हायव्हल

पणजी : विठ्ठल गावडे पारवाडकर :  समुद्राच्या तळापर्यंत जाऊन जिंवत राहून संशोधन करण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या गोव्यातील व देशातील पहिल्या 'सी सर्व्हायव्हल' केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लोकार्पण केले.

संबंधित बातम्या 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी (दि. ६) रोजी मडगाव येथे आयोजित जाहीर कार्यक्रमात दोनापावला पणजी येथील एनआयडब्ल्यूएस कॅम्पसमधील 'ओएनजीसी सी सर्व्हायव्हल इको-सिस्टम सेंटर'चे शानदार उद्घाटन केले. या केंद्रात समुद्री वातावरणाशी कसे जुळवून घ्यावे, समुद्री वातावरण बिघडल्यास स्वतः चा आणि इतरांचा बचाव कसा करावा, याचे प्रशिक्षण तरुणांना दिले जाणार आहे. हे देशातील पहिले प्रशिक्षण केंद्र ठरले आहे.

'ओएनजीसी सी सर्व्हायव्हल इको-सिस्टम सेंटर'ची रचना जागतिक मानकांनुसार करण्यात आली आहे. येथे वर्षभरात १० ते १५ हजार जवानांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. मडगाव येथे पंतप्रधान मोदी यांनी एनर्जी वीकचे उदघाटन केले. त्यानंतर मडगाव येथील विशाल सभेत एनआयटी व काकोडा येथील अत्याधुनिक कचरा प्रकल्पाचे उदघाटन केले.

यावेळी ‍केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरिदीपसिंग पुरी, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक व अन्य मान्यवर उपस्थित होते.

समुद्रातील उद्योगांना चालना देण्यास उपयुक्त

देशाला पेट्रोलियम आणि बायोगॅस क्षेत्रात आत्मनिर्भर करण्याचा केंद्र सरकारने संकल्प केला आहे. हे इंधन समुद्रातून काढावे लागते. अशा इंधन निर्मिती केंद्रांवर काम करण्यासाठी आगामी काळात मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागणार आहे. समुद्रातील उद्योगांना चालना देण्यासाठी, तेथील वातावरणाशी जुळवून घेणारे मनुष्यबळ तयार करणे गरजेचे आहे. त्यासाठी हे प्रशिक्षण केंद्र उपयुक्त ठरणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news