prevent sleep : अभ्‍यासावेळी किंवा ऑफीसमध्ये झोप येते? मग ‘या’ टिप्स करतील मदत

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : झोप ही निरोगी आयुष्‍याचा पाया आहे. आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्‍य चागलं राखण्‍यासाठी झोपचे महत्त्‍व नव्‍याने सांगण्‍याची गरज नाही; पण मुलं अभ्‍यास करताना आणि ऑफीसमध्‍ये टेबल वर्क करताना झोप येणे हे त्रासदायक ठरतं. विद्‍यार्थी असो की कर्मचार्‍यांच्‍या कामगिरीवर त्‍याचा नकारात्मक परिणाम होतो. (  prevent sleep )  हा त्रास वारंवार होणार्‍यांनी काही टिप्‍स फॉलो केल्‍यातर डुलकी चुटकीसरशी निघूनही जाते. जाणून घेवया या टिप्‍स विषयी…

एकाच ठिकाणी सलग बसू नका

तुम्‍ही जर एकाच ठिकाणी बराच वेळ बसत असाल तर तुम्‍हाला झोप येण्याची शक्‍यता वाढते. कारण सलग एकाच शारीरिक स्‍थितीत बसल्‍यामुळे शरीर आरामाच्‍या अवस्‍थेत जाण्‍यास सुरुवात होते. त्‍यामुळे एकाच ठिकाणी सलग बसू नये. तुम्‍ही सलग अर्धा तास किंवा एक तास बसत असाल तर तुमचे आसन सोडा, काही पावले चालून या. विशेषत: विद्यार्थ्यांनी ही कृती जरुर करावी. तसेच ऑफीसमध्‍ये टेबल वर्क करणार्‍या कर्मचार्‍यांनी एका तासाला काही मिनिटे उठून उभे राहावे. र्यालयात पिण्‍याची पाण्‍याची सोय असतेच येथे पाणी पिण्‍यासाठी जावे किंवा सोबत असलेली बाटली भरण्‍यासाठी जावे. यामुळे शतपावली होते आणि शरीर विश्राम अवस्‍थेततून जागृत अवस्‍थेत जाण्‍यास मदत होते. त्‍यामुळे अनावरण झालेली झोप निघून जाण्‍यास मदत होते.

उजेड असणार्‍या ठिकाणीच बसा

अभ्‍यास असो की कार्यालयीन कामकाज या दोन्‍ही ठिकाणी पुरेसा उजेड नसेल तर झोप येण्‍याची शक्‍यता वाढते. अभ्‍यास किंवा कार्यालयीक कामकाज हे पुरेशा उजेडात केले पाहिजे. खोलीच्‍या खिडक्‍या उघडून नैसर्गिक उजेड आपल्‍यावर पडणे आवश्‍यक ठरते. नैसर्गिक उजेडामुळे शरीर ताजेतवाणे होते. यामुळे झोपेची इच्‍छा कमी होते.

 prevent sleep : योग्‍यरित्‍या बसा

अनेकवेळा मुले अभ्‍यास करताना घरात चुकीच्‍या पद्‍धतीने बसतात. तुम्‍ही अधिक विश्राम अवस्‍थेत असाल तर झोप लवकर लागते. तसेच तुम्‍ही वर्कफ्रॉम होम करत असाल तर टेबल किंवा बेडवर झोपून काम केल्‍यास झोप लागू शकते. घरी काम करत असला तरी टेबल आणि खुर्चीचा वापर करा. योग्‍यरित्‍या बसल्‍याने तुमची देहबोली ही अधिक सजग होण्‍यास मदत होते. यातूनच मग तुम्‍ही अधिक जागृत होता. अनावरण झालेली झोप तुम्‍ही टाळू शकाल.

रात्री पुरेशी झोप घ्‍या

तुमची रात्री सलग सात ते आठ तास झोप होणे आवश्‍यक असते. यामुळे तुम्‍ही दुसर्‍या दिवशी अधिक चागंल्‍या पद्‍धतीने काम करु शकता. यासाठी वेळेचे नियोजन करा. रात्रीचे जागरण टाळा. अपुर्‍या झोपेचे शरीरावर दुष्‍परिणाम होतातच. त्‍याचबरोबर तुमचा दुसरा दिवसही आळसामुळे खराब होतो. यामुळे रात्रीच पुरेशी झोप घेतली तर दुसर्‍या दिवशी तुम्‍ही अधिक सक्षमपणे अभ्‍यास किंवा काम करु शकता.

अलर्ट रहा

बराचवेळा पुस्‍तक किंवा कप्‍युटर स्क्रीनवर डोळे असतात मात्र आपले मन अलर्ट मूडमध्‍ये असत नाही. त्‍यामुळे झोप येवू लागते. त्‍यामुळे तुम्‍ही काम करत असा की अभ्‍यास तुम्‍ही एकाग्रात साधू शकत नाही. तुम्‍हाला स्‍वत:ला अलर्ट ठेवायचे असेल तर काहीवेळ चालून या, तसेच तुमच्‍या आवडीचे संगीत ऐका. जर तुम्‍ही घरात असाल तर थोडा डान्‍स करा. यामुळे मन ताजेतवाने होते. यामुळे तुम्‍ही अलर्ट राहता.

योग्‍य आहार घ्‍या

जर तुम्‍ही योग्‍य आहार घेत नसला तर अभ्‍यास करताना किंवा कार्यालयीन कामकाज करताना झोप येण्‍याचे कारण असू शकते. त्‍यामुळे ज्‍या पदार्थांमुळे तुम्‍हाला उर्जा मिळते असाच आहार घ्या. त्‍यामुळे एकाचवेळी पोटभर खावू नका त्‍यामुळे शरीर सुस्‍त होते. साखर युक्‍त पेयांपासूनही लांब रहा तर तीन तासाला हलका आहार घ्‍या, यामुळे तुम्‍ही अधिक उर्जावान व्‍हाल, यामुळे अवे‍ळी झोप येणार नाही.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news