२२ जानेवारीला काळाराम मंदिरातील कार्यक्रमाच राष्ट्रपतींना निमंत्रण : उद्धव ठाकरे

२२ जानेवारीला काळाराम मंदिरातील कार्यक्रमाच राष्ट्रपतींना निमंत्रण : उद्धव ठाकरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून २२ जानेवारी रोजी नाशिक येथील काळाराम मंदिरात आरतीमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे. मुंबई येथे आज (दि.१३) उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, २२ जानेवारीला नाशीकच्या काळाराम मंदिरात जाणार आहे. गोदातिरावर आरतीही करणार आहे. २२ जानेवारीला काळाराम मंदिरातील या कार्यक्रमाच निमंत्रण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देण्यात येत आहे. सोमनाथ मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी तेव्हा राष्ट्रपतींना बोलावण्यात आले होते. आताही काळाराम मंदिरात रामाची प्राणप्रतिष्ठा राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावी, यासाठी त्यांना निमंत्रण देण्यात येत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

"मी कडवट हिंदुत्वादी आहे. राम मंदिरासाठी शिवसेनेचं योगदान सर्वांना माहित आहे. कारसेवकांच्या धाडसाशिवाय राम मंदिर झालं नसतं. 'पहिले मंदिर फिर सरकार' ही शिवसेनेची घोषणा होती. २२ जानेवारीला दिवाळी साजरी करा पण दिवाळं निघालं त्यावरही चर्चा करा, असा टोला ठाकरे यांनी भाजपला लगावला. मी अयोध्येत राम जन्मभूमीची माती घेवून गेलो होतो. माझ्या मनात येईल तेव्हा मी अयोध्येला जाणार आहे, असेही ते म्हणाले.

नाव अटल सेतू पण अटल बिहारी वाजपेयी यांचा फोटोच नाही. राम मंदिरातही रामाची मूर्ती असेल का? की दुसरीच कुणाची? असा टोला त्यांनी पंतप्रधान मोदी यांना लगावला. मोदी घराणेशाहीवर बोलतात पण गद्दारांच्या घराणेशाहीवर ते बोललेच नाहीत, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news