Prabhas Salaar : प्रभासच्या ‘सालार’चा हिंदी मार्केटमध्ये ९० कोटींचा गल्ला

Salaar
Salaar

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रभासचा मास अ‍ॅक्शन एंटरटेनर सालार : भाग १ – मोठ्या पडद्यावर रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर सालार सीझफायरची चर्चा होतेय. या चित्रपटाला प्रेक्षकांचे उत्स्फूर्त प्रेम मिळत असतानाच चित्रपटगृहांमध्येही चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी झाली आहे. तर हिंदी पट्ट्यात या चित्रपटाने पाचव्या दिवशी १०.२५ कोटींची कमाई केली आहे. (Prabhas Salaar) एकूण ५ दिवसांत ९०.६ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. मात्र, हा प्रभास स्टारर चित्रपट रिलीज झाल्यापासून विक्रम प्रस्थापित करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीये. चित्रपटगृहांमध्ये चमकदार कामगिरी करत, चित्रपटाने पाचव्या दिवशी हिंदी प्रदेशांमध्ये १०.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. याशिवाय चित्रपटाने केवळ वीकेंडलाच नाही तर इतर दिवशीही चांगली कमाई केली आहे. (Prabhas Salaar)

संबंधित बातम्या-

हिंदी पट्ट्यात, सालार: भाग १ – सीझफायरने पहिल्या दिवशी शुक्रवारी १८.९० कोटी, शनिवारी दुसऱ्या दिवशी १८.९५ कोटी, रविवारी तिसऱ्या दिवशी २४.५० कोटी, सोमवारी चौथ्या दिवशी १८ कोटी कमावले आहेत. चित्रपटाने ५ दिवसांत हिंदी मार्केटमध्ये एकूण ९०.६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा खरोखरच चित्रपटाच्या प्रगतीचा पुरावा आहे की मंगळवारी, जो कामाचा दिवस होता, त्याचे कलेक्शन दुहेरी अंकात होते. त्यामुळे चित्रपटाचा आलेख उंचावताना दिसत आहे.

होम्बले फिल्म्सचा सालार : भाग १ सीझफायर चित्रपट निर्माते प्रशांत नील यांनी दिग्दर्शित केला आहे. यात प्रभास, श्रुती हासन, पृथ्वीराज सुकुमारन आणि जगपती बाबू आहेत. चित्रपटाची निर्मिती विजय किरगांडूर यांनी केली आहे. हा चित्रपट आता थिएटरमध्ये पोहोचला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news