Ananya Panday : ‘खो गए हम कहाँ’ नंतर अनन्याची खास पोस्ट, म्हणाली…. | पुढारी

Ananya Panday : 'खो गए हम कहाँ' नंतर अनन्याची खास पोस्ट, म्हणाली....

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी आणि आदीश गौरव यांचा ‘खो गे हम कहाँ’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर २६ डिसेंबर रोजी चाहत्यांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटाची कहाणी अहना, इमाद आणि नील या तीन मित्राच्यात गुंफलेली आहे. आजच्या डिजिटल युगात, हा चित्रपट प्रेम, मैत्री आणि परस्पर संबंधांमध्ये सोशल मीडियाचा हस्तक्षेप कसा वर्चस्व गाजवितो हे दाखवण्यात आले आहे. अनन्याने ( Ananya Panday ) ‘खो गे हम कहाँ’ या चित्रपटात ‘अहना’ ची मुख्य भूमिका साकारली आहे. चित्रपट रिलाज होताच चाहत्यांनी तिचे कौतुक करताना भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर सोशल मीडियावर कॉमेन्टसचा पाऊस पडलाय. याचदरम्यान अनन्याने सोशल मीडियावर चाहत्यांसाठी एक खास पोस्ट शेअर केलीय. तर दुसरीकडे ती बॉयफ्रेंड आदित्य कपूरसोबत नव वर्षाच्या तयारीलाही लागली आहे.

संबंधित बातम्या 

‘खो गए हम कहाँ’ या चित्रपटानंतर अभिनेत्री अनन्या पांडेने ( Ananya Panday ) नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. यात तिने लिहिले की, ‘खो गए हम कहाँ’ चित्रपटातील ‘अहाना’ ला खूपच प्रेम दिल्याबद्दल चाहत्यांचे आभार, आपण दिलेल्या प्रेमाची खूपच गरज होती. धन्यवाद.’ या पोस्टसोबत तिने तिच्या चित्रपटाशी संबंधित असणाऱ्या सर्व लोकांचे आभारही मानले आहेत.

या पोस्टमध्ये तिने, ‘ अभिनेत्रता फरहान अख्तर, झोया अख्तर, रीमा कागट्टी आणि अर्जुन … या चित्रपटाचा एक भाग बनवल्याबद्दल धन्यवाद.’ याशिवाय अनन्याने सहकलाकार सिद्धांत चतुर्वेदी आणि आदीश गौरव यांनीही टॅग केलं आहे. दरम्यान अनन्यासोबत सिद्धांत चतुर्वेदीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून प्रेक्षकांचे कृतज्ञता व्यक्त केली आहे. ‘हा चित्रपट माझ्यासाठी ‘भावनिक रोलर-कॅस्टर’ सारखा आहे.’ असे त्याने म्हटलं आहे. चित्रपटात सिद्धांत ‘इमाद’ ची भूमिका साकारत आहे.

या पोस्टनंतर अनन्या नुकतेच अनन्या तिच्या बॉयफ्रेंड आदित्य रॉय कपूरसोबत विमान तळावर स्पॉट झाली. यावेळी अनन्या आणि आदित्य कपूर दोघेजण कॅज्युअल लुकमध्ये खुपच सुंदर दिसत होते. हा व्हिडिओ विरल भयानी इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला त्यांनी ‘नवीन वर्षाच्या तयारीत लव्ह बर्डस्!,आदित्य रॉय कपूर, अनन्या पांडे.’ कॅप्शन लिहिली आहे. यावरून अनन्या आणि आदित्य नव वर्षाच्या स्वागतासाठी जात असल्याचे बोलले जात आहे. या व्हिडिओला आतापर्यत ४७ हजांराहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.

( video : viralbhayani and photo : Ananya Panday instagram वरून साभार)

 

Instagram पर यह पोस्ट देखें

 

Viral Bhayani (@viralbhayani) द्वारा साझा की गई पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday)

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in)

Back to top button