The Batman Part II : बॅटमॅनचा खलनायक इतका गुप्त की, ‘चेहराही लपवून ठेवला’ | पुढारी

The Batman Part II : बॅटमॅनचा खलनायक इतका गुप्त की, 'चेहराही लपवून ठेवला'

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘द बॅटमॅन भाग-२’ची चर्चा इतकी झाली की, त्यातील खलनायकाबद्दल अफवा पसरल्या. शिवाय, बॅटमधील खलनायकाची माहिती इतकी गुप्त ठेवण्यात आली की, चेहराही लपवून ठेवण्यात आला. मॅट रिव्ह्जच्या ७७१ मिलियन डॉलर इतकी कमाई करमाऱ्या बॅटमॅन रीबूटच्या पुढील भागाची इत्यंभूत माहिती समोर आलेली नाही. (The Batman Part II) वार्नर ब्रदर्सने अधिकृतरित्या मागील वर्षात एप्रिलमध्ये केली होती. डीसी स्टुडिओजचे प्रमुख जेम्स गन आणि पीटर सफ्रान यांनी ३ ऑक्टोबर, २०२५ रीलीड डेटची पुष्टी केलीय. रिपोर्टनुसार, बॅटमॅन-२ एक नवा चेहरा सादर करेल. द बॅटमॅन २ चे शूटिंग २०२४ च्या उन्हाळ्यात सुरू होणार आहे. (The Batman Part II)

संबंधित बातम्या –

बॅटमॅन हे मूळचे डीसी कॉमिक्समधील एक पात्र आहे. बॅटमॅनचे चित्रपट ही अशी फ्रँचाईजी आहे. जी इतर सर्व सुपरहिरोजपेक्षा वेगळी आणि खास आहे. या चित्रपटांनी बॅटमॅनच्या चित्रपटांचा एक बेंचमार्क सेट केला आहे. त्यामुळेच आता नव्या ‘द बॅटमॅन’कडूनही प्रेक्षकांना मोठी अपेक्षा आहे. तथापि, या चित्रपटाच्या ट्रेलरमधून दिसते की चित्रपटात काळ्या रंगाचा वापर जास्त आहे. अनेक भारतीयांना तो पचनी पडत नसला तरी डीसी कॉमिक्सच्या फॅन्सना असेच डार्क चित्रपट आवडतात.

मॅट रिव्हज दिग्दर्शित या चित्रपटत ज्यो क्रावित्झ, जेफ्री राईट, जॉन टुरटुरो, पॉल डानो, पीटर सरसागर्ड यांच्या भूमिका आहेत.

Back to top button