Prabhas Movie Salaar Trailer : प्रभासकडून मोठं गिफ्ट, ट्रेलर रिलीज तारीख जाहीर

salar movie
salar movie

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'सालार' च्या ट्रेलर रिलीजची तारीख जाहीर करण्यात आलीय. (Prabhas Movie Salaar Trailer ) ख्रिसमसच्या मुहूर्तावर डिसेंबरमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर निर्मात्यांनी ही घोषणा केली असून ट्रेलर कोणत्या तारखेला रिलीज होणार, हे सांगण्यात आले आहे. (Prabhas Movie Salaar Trailer)

संबंधित बातम्या –

होंबळे फिल्म्सने या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे, ज्यामध्ये प्रभास अॅक्शन पोझमध्ये दिसत आहे. तो हातात बंदूक घेतलेला दिसत आहे. पोस्टरसोबत चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. दिवाळीनिमित्त चाहत्यांना मोठे गिफ्ट देण्यात आले आहे. होंबळे फिल्म्सच्या ट्विटर हँडलवरून शेअर केलेल्या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये लिहिले आहे की, त्याचा ट्रेलर १ डिसेंबर, २०२३ रोजी प्रदर्शित होईल.

ट्रेलर कधी आणि किती वाजता रिलीज होणार?

प्रभासच्या 'सालार' चित्रपटाचे पोस्टर शेअर करण्यासोबतच निर्मात्यांनी असेही म्हटले आहे की, 'ग्रँड सेलिब्रेशनसाठी सज्ज व्हा. 'सलार'चा ट्रेलर १ डिसेंबर रोजी संध्याकाळी ७.१९ वाजता प्रदर्शित होणार आहे. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा." या घोषणेनंतर चाहते चित्रपटासाठी खूप उत्सुक झाले आहेत.

शाहरुखच्या 'डिंकी'सोबत 'सालार'ची टक्कर होणार

प्रभासचा चित्रपट 'सालार' बॉक्स ऑफिसवर शाहरुख खानच्या 'डिंकी'सोबत टक्कर देणार आहे. दोन्ही चित्रपट एकाच दिवशी म्हणजे २२ डिसेंबर, २०२३ रोजी थिएटरमध्ये रिलीज होईल. या दोन्ही चित्रपटांची लोकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. 'डिंकी'चा टीझर आधीच रिलीज झाला आहे. आता ट्रेलरची प्रतीक्षा आहे. 'सालार' आणि 'डिंकी'बद्दल लोकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. अशा परिस्थितीत बॉक्स ऑफिसवर कोणता चित्रपट बाजी मारतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news