Bollywood Diva Celebs Diwali : करीना-आलिया रेड सूटमध्ये, दिवाळी पार्टीत ‘या’ सेलिब्रिटींनी लावले चारचाँद

करीना कपूर-सैफ अली खान-कुणाल कपूर-सोहा अली खान-शर्मिला टागोर-सारा अली खान
करीना कपूर-सैफ अली खान-कुणाल कपूर-सोहा अली खान-शर्मिला टागोर-सारा अली खान

पुढारी ऑनलाईन डेस्क – दिवाळीचे वातावरण आहे, सर्व घरांमध्ये दिवे आणि लाईट्सने इमारीत सजल्या आहेत. दिवाळीच्या निमित्ताने करीनाने आपल्या घरी एक छोटी पार्टी दिली होती. (Bollywood Diva Celebs Diwali) या पार्टीत आलिया भट्ट रेड आऊटफिटमध्ये पोहोचली तर रणबीर कपूर ब्लॅक नेहरू सूटमध्ये दिसला. रणबीर-आलियाचा रोमँटिक अंदाज यावेळी पाहायला मिळाला. दोघे एकमेकांच्या हातात हात घालून जाताना दिसले. (Bollywood Diva Celebs Diwali)

संबंधित बातम्या –

करीनाचे दिवाळी पार्टी फोटोज

करीनाने फ्लॉवर प्रिंट रेड साडी नसली होती तर सैफने ब्लॅक कुर्ता आणि व्हाईट धोती घातली होती. आलिया-रणबीर कपूर दोघींनीही पार्टी लाईमलाईटला चारचाँद लावले. करीनाच्या या पार्टीत अनेक बॉलिवूड स्टार आले होते. यामध्ये सारा अली खान, शर्मिला टागोरदेखील सहभागी झाल्या होत्या.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांची पहिली दिवाळी आहे. दिवाळीला तिने आपले घर दिवे, पणत्या, फुले आणि कँडलने सजवले आहे. डकोरेशनची झलक तिने शेअर केलीय. हे पोटो शेअर करताना तिने हॅप्पी दिवाली अशी कॅप्शन लिहिलीय.

प्रियांका चोप्रा निकसोबत परदेशात दिवाळी साजरी करत आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला असून फर्स्ट रंगोली अशी कॅप्शन आणि हार्ट इमोजीदेखील शेअर केलीय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news