नगर : पुढारी वृत्तसेवा
लाल किल्ल्यावर पाकिस्तानचा झेंडा टाकून पोस्टर तयार करणाऱ्या आणि ते इन्स्टाग्रामवर व्हायरल करणाऱ्या नगरमधील युवकास कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे.
अहमदनगर शहरातील एका तरुणाने लाल किल्ल्यावर असेलला झेंडा हटवून त्या ठिकाणी पाकिस्तानचा झेंडा फडवकल्याचे पोस्टर इन्स्टाग्रामवर टाकल्याचे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली.
पोलिसांनी या प्रकरणी तातडीने हालचाली करत आदनान नामक एका युवकास ताब्यात घेऊन कोतवाली पोलिस ठाण्यात आणले आहे. पुढील कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे.