Pooja katurde : ‘हृदयी प्रीत जागते ही मालिका माझ्यासाठी वेगळा अनुभव’

pooja katurde
pooja katurde
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : 'हृदयी प्रीत जागते या मालिकेतील अनुभव, गोष्टी अभिनेत्री पूजा कातुर्डे ( Pooja katurde) हिने शेअर केले आहेत. ती या मालिकेत वीणा हे पात्र साकारतेय. या मालिकेबद्दल बोलताना म्हणाली, ही एक संगीतमय प्रेमकथा आहे, जी संगीताची समान आवड असलेल्या दोन विरुद्ध व्यक्तिमत्त्वांचा प्रवास दर्शवते. प्रेक्षकांसाठीही हा एक वेगळा अनुभव असणार आहे. मला म्युझिक फार आवडतं म्हणजे संगीताची भिन्न शैली ऐकायला आवडते. म्हणून ही कथा माझ्याशी जोडलेली आहे, इतकच नवे तर ही कथा आज सर्व वयोगटांशी जोडलेली आहे आणि मला खात्री आहे की प्रेक्षक सुद्धा खूप आवडीने ही मालिका पाहतील. कारण ही मालिका एक वेगळी आणि अनोखी संकल्पना घेऊन येते. (Pooja katurde)

वीणा या भूमिकेबद्दल बोलताना ती म्हणाली – वीणा ही अतिशय साधी मुलगी आहे आणि ती तिच्या बाबांची खूप लाडकी आहे. वीणा लहानपणापासून आईच्या प्रेमाला मुकली आहे. त्यामुळे बाबाच तिच्यासाठी सर्वस्व आहेत. वीणाचे वडील कीर्तनकार आहेत, तिला कीर्तनाची आवड आहे. कौटुंबिक संबंध मजबूत आणि एकजूट ठेवणे हे तिचे ध्येय आहे. या मालिकेत वीणा आणि प्रभास ते दोघेही त्यांच्या स्वभावात, जीवनशैलीत वेगळे ध्रुव आहेत, पण संगीत हा त्यांच्यातील एकमेव समान धागा आहे. वीणा कीर्तनकार आहे तर प्रभास रॉक बँड परफॉर्मर आहे. ते दोघेही संगीतासाठी वचनबद्ध आहेत.

सेटवर काम करताना सहकलाकारांबद्दल बोलताना पूजा म्हणते- 'सिद्धार्थ म्हणजेच प्रभासबद्दल सांगायचं झालं तर तोच खूप मेहनती आहे आणि तो त्याच्या कामाबद्दल खूप उत्कट आहे. त्याला सुद्धा माझ्यासारखी संगीताची खूप आवड आहे. त्यामुळे सेटवर आमच्या दोघांचं छान जमतं.'

पूजाने यापूर्वी अनेक मालिका, वेब सिरीज आणि नाटकांमध्ये काम केले आहे. झी मराठी बरोबर तिची ही पहिलीच मालिका आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news