Pooja Bhatt Controversial Kiss : ‘त्या’ वादग्रस्त किसिंगवर पूजा भट्टचा खुलासा, म्हणते-

mahesh bhatt-pooja bhatt
mahesh bhatt-pooja bhatt
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा भट्ट अलीकडेच बिग बॉस ओटीटी २ मध्ये दिसली होती. येथे तिने आपल्या ग्लॅमरस अभिनयाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. पूजा भट्टने १९९० मध्ये तिचे वडील महेश भट्ट यांच्यासोबत केलेल्या मॅगझिनच्या कव्हर पेजबद्दल उघडपणे सांगितले. (Pooja Bhatt Controversial Kiss) या मॅगझिनसाठी अभिनेत्रीने स्वतःच्या वडिलांसोबत लिप-लॉक केले होते. पण यामागची कहाणी काय आहे, याचा खुलासा पूजा भट्टने केला. (Pooja Bhatt Controversial Kiss)

एका मुलाखतीत, पूजाने मॅगझिनकडे मीडियाचे लक्ष वेधून घेतले आणि सांगितले की, कॅप्चर केलेला तो किसिंग क्षण 'अगदी निर्दोष' होता आणि लोक ते कसे समजून घेतात, याबद्दल ती काहीही करू शकत नाही. ज्यांना जे समजायचं आहे, ते समजू देत. एका मुलाखतीत पूजाला विचारण्यात आले की तिला या गोष्टीचा पश्चाताप होतो का? त्यावर ती म्हणाली, "नाही, कारण मला ते खूप सोपे वाटते आणि मला वाटते की हे कामाचाच एक भाग आहे.

ती पुढे म्हणाली, एखादा क्षण कोणत्याही प्रकारे किंवा चुकीच्या पद्धतीने मांडला जाऊ शकतो. ती म्हणाली, मला आठवते की, शाहरुखने मला सांगितले होते की जेव्हा तुमच्या मुली असतात आणि तुझे मूल लहान असते, तेव्हा ते किती वेळा म्हणतात, 'मम्मी पप्पा, मला एक चुंबन द्या' आणि ते करतात. कारण त्यांच्यावर प्रेम असते.

पूजा म्हणाली, मी सुद्धा माझ्या वडिलांसाठी तशीच मुलगी आहे. ते माझ्यासाठी नेहमीच असेच असतील." ते म्हणाले, "म्हणून तो एक क्षण होता जो अगदी निरागस होता, जो कॅमेरामध्ये कॅप्चर करण्यात आला. त्याचा अर्थ काय, ज्यांना जे वाटायचे आहे, वाटू दे. ज्यांना ज्या दृष्टीकाणातूप पाहायचे आहे, पाहू देत. या गोष्टीचा मला अभिमान आहे. मी कोणत्याही गोष्टीचा बचाव करायला बसलेले नाही.

पूजा भट्ट म्हणाली, जर लोकांना वडील आणि मुलीच्या नात्याकडे वेगळ्या दृष्टीकोनातून बघता आले तर ते काहीही करू शकतात. मग आपण कौटुंबिक मूल्यांबद्दल बोलतो. किती मोठा विनोद आहे.पूजा शेवटी बिग बॉस ओटीटी सीझन-२ मध्ये दिसली होती. ती एल्विश यादव, मनीषा राणी, बबिका धुर्वे आणि अभिषेक मल्हान यांच्यासह अंतिम फेरीपर्यंत पात्र ठरण्यात यशस्वी ठरली आणि नंतर बिग बॉसच्या घराबाहेर पडली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news