The Big Bang Theory : माधुरीवर ‘अपमानास्पद टिप्पणी’ करणे पडले भारी, Netflix ला नोटिस

madhuri dixit
madhuri dixit

पुढारी ऑनलाई डेस्क : माधुरी दीक्षितच्या डान्सची नाही तर अभिनयाची चर्चादेखील सोशल मीडियावर नेहमी होते. फॅन्स नेहमी माधुरीला पाठींबा देत असतात. आता एका राजकीय विश्लेषकाने 'बिग बँग थ्योरी'च्या (The Big Bang Theory) एका एपिसोडवरून स्ट्रीमिंग कंपनी नेटफ्लिक्सला कायदेशीर नोटिस पाठवली आहे. यामध्ये माधुरी दीक्षितविषयी "अपमानास्पद शब्द" वापरल्याचे म्हटले आहे. (The Big Bang Theory)

राजकीय विश्लेषक मिथुन विजय कुमारने कानूनी नोटिसमध्ये कार्यक्रमाच्या सीजन दोनच्या आधी एपिसोड हटवण्यासाठी म्हटलं होतं. यामध्ये कुणाल नैयरद्वारा भूमिका साकारण्यात आलेल्या राज कुथरापल्लीचे पात्र आणि शेल्डन कूपरची भूमिका साकारणारे जिम पार्सन्सने ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षितची तुलना केली होती.

कायदेशीर नोटिसमध्ये राजकीय विश्लेषकाने म्हटलं की, पात्रांद्वारे केलेली टिप्पणी न केवळ अपमानास्पद आहे तर मानहानिकारकदेखील आहे. तिने नेटफ्लिक्सचा एपिसोड हटवण्याची विनंती केलीय. जर हा एपिसोड हटवला गेला नाही तर त्यांनी कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागेल, असे म्हटले आहे. कायदेशीर नोटिस मुंबईमध्ये नेटफ्लिक्सच्या कार्यालयात पाठवण्यात आले आहे.

ट्विटमध्ये नेटफ्लिक्सला पाठवण्यात आलेल्या नोटिसचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये राजकिय विश्लेषकाने लिहिलं आहे-नुकताच मी नेटफ्लिक्सवर शो बिग बँग थ्योरीचा एक एपिसोड पाहिला. जिथे कुणाल नय्यरचे पात्र दिग्गज बॉलिवूड अभिनेत्रीला दाखवण्यासाठी एक अपमानास्पद शब्दाचा वापर करतो. बालपणापासून माधुरी दीक्षितचा फॅन होण्याच्या नात्याने मी या डायलॉगमुळे खूप चिंतेत होतो. यामध्ये मी भारतीय संस्कृती आणि महिलांच्या प्रती खूपच अपमानास्पद डायलॉग ऐकले. यासाठी मी आमच्या वकिलांना नेटफ्लिक्सला एक कायदेशीर नोटिस पाठवण्यास सांगितले होते तसेच हा एपिसोड हटवण्याची मागणी केली. मीडिया कंपन्यांना त्यांच्याद्वारे देण्यात आलेल्या कंटेंटसाठी जबाबदार धरणे आवश्यक आहे आणि मला अपेक्षा आहे की, Netflix India या प्रकरणाला गंभीरतेने घेईल."

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news