PNB : पंजाब नॅशनल बँकेला लुटले

PNB : पंजाब नॅशनल बँकेला लुटले
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क :  पंजाबमधील अमृतसरमध्ये गुरुवारी दिवसाढवळ्या दरोडेखोरांनी पंजाब नॅशनल बँकेवर (पीएनबी) २ अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकला. काही मिनिटांत बँकेतून 22 लाख रुपये लुटून त्यांनी पळ काढला. ही संपूर्ण घटना बँकेत लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. (PNB)

PNB : 22 लाखांची लूट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  अमृतसरमधील रानी का बागमध्ये ही घटना घडली. येथे दुपारी १२.०९ वाजता दोन दरोडेखोर स्कूटीवरून पंजाब नॅशनल बँकेबाहेर पोहोचले. एक दरोडेखोर बाहेर उभा होता. तर दुसरा मुखवटा घातलेला माणूस बँकेच्या आत गेला. त्याने पिवळा टी-शर्ट आणि टोपी घातली होती.बँकेत घुसलेल्या दरोडेखोराने हातात पिस्तूल घेतले होते. तो थेट कॅशियरच्या खिडकीबाहेर गेला आणि तिथे बसलेल्या कर्मचाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवला. एक लिफाफा देत त्यात पैसे भरण्यास सांगितले. यानंतर कॅशियरने सुमारे २२ लाख रुपये ठेवले. दरोडोखोऱ्याने ते पैसे  उचलले आणि बँकेतून निघून गेले.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news