PM Modi : भारत व्यावसायिक आधारावर सेमीकंडक्टर चिप्स तयार करणार : पंतप्रधान मोदी

PM Modi : भारत व्यावसायिक आधारावर सेमीकंडक्टर चिप्स तयार करणार : पंतप्रधान मोदी

पुढारी ऑनलाईन डेस्क : सेमीकंडक्टर उद्योग क्षेत्र वाहतूक आणि दळणवळण यांसारख्या इतर अनेक क्षेत्रांशी संलग्न आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत या क्षेत्रातून महसूल आणि रोजगार निर्मितीची मोठी क्षमता आहे. चिप मॅन्युफॅक्चरिंग केवळ रोजगारासाठीच नव्हे तर तांत्रिक प्रगतीसाठीही मार्ग उघडते. भारतात आगामी काळात सेमीकंडक्टर (Semiconductor Facilities) आणि संबंधित उत्पादनांचे व्यावसायिक उत्पादन सुरू करू. या क्षेत्रातही भारत लवकरच जागतिक महासत्ता बनणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी केले.

पंतप्रधान मोदी यांनी आज (दि.१३) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तीन सेमीकंडक्टर सुविधांची (Semiconductor Facilities) पायाभरणी केली. यावेळी ते बोलत होते. १.२५ लाख कोटींची पायाभरणी केलेल्या तीन सेमीकंडक्टरपैकी दोन सुविधा गुजरातमध्ये तर एक आसाममध्ये आहे.

"एकविसावे शतक तंत्रज्ञानावर आधारित आहे. इलेक्ट्रॉनिक चिप्सशिवाय त्याची कल्पनाही करता येत नाही. मेड इन इंडिया चिप, डिझाईन इन इंडिया चिप भारताला आत्मनिर्भरता आणि आधुनिकतेकडे घेऊन जाईल," असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केला. आज भारत प्रगतीसाठी, स्वावलंबनासाठी आणि जागतिक पुरवठा साखळीत आपल्या उपस्थितीसाठी सर्वांगीण कार्य करत आहे. मेड इन इंडिया चिप, डिझाईन इन इंडिया चिप, भारताला आत्मनिर्भरता आणि आधुनिकतेकडे घेऊन जाईल. चिप उत्पादन हा केवळ उद्योग नाही, हे विकासाचे दरवाजे उघडते. हे क्षेत्र केवळ भारतात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणार नाही, तर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही मोठी प्रगती होणार असल्याचे मोदी (PM Modi) म्हणाले.

"भारत आधीच टेक-स्पेस, अणुशक्ती आणि डिजिटल शक्ती आहे. आगामी काळात आम्ही सेमीकंडक्टर (Semiconductor Facilities) आणि संबंधित उत्पादनांचे व्यावसायिक उत्पादन सुरू करू. या क्षेत्रातही भारत लवकरच जागतिक महासत्ता बनणार आहे. आजचे निर्णय आणि धोरणे आपल्याला भविष्यात धोरणात्मक फायदा देतील, असा विश्वास मोदी (PM Modi) यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news