गुजरात किनाऱ्याजवळ ४८० कोटींचे अंमली पदार्थ जप्‍त, ६ पाकिस्‍तानी अटकेत | पुढारी

गुजरात किनाऱ्याजवळ ४८० कोटींचे अंमली पदार्थ जप्‍त, ६ पाकिस्‍तानी अटकेत

पुढारी ऑनलाइंन डेस्‍क : गुजरातमधील पोरबंदरजवळ साेमवारी रात्री ४८० कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्‍त करण्‍यात आले. या प्रकरणी सहा पाकिस्तानी नागरिकांना अटक केली आहे, असे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. गेल्या 30 दिवसांत गुजरातच्या किनाऱ्यावरून जप्त करण्यात आलेला अंमली पदार्थांचा दुसरा मोठा साठा आहे. 28 फेब्रुवारी रोजी गुजरातच्या किनारपट्टीवर 2,000 कोटी रुपयांचे किमान 3,300 किलो अमली पदार्थ जप्‍त करण्‍यात आले होते.

अंमली पदार्थ नियंत्रण विभागाला (एनसीबी ) किनार्‍याजवळ अंमली पदार्थांच साठा येणार असल्‍याची माहिती मिळाली होती. त्‍यानुसार भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकाच्‍या ( एटीएस ) च्या अधिकाऱ्यांनी सोमवारी रात्री भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत असताना पाकिस्तानी नागरिकांना पकडले.

गेल्या 30 दिवसांत गुजरातच्या किनाऱ्यावरून जप्त करण्यात आलेला अंमली पदार्थांचा दुसरा मोठा साठा आहे. यापूर्वी 28 फेब्रुवारी रोजीसंशयित पाकिस्तानी क्रू सदस्यांनी चालवलेल्या बोटीतून किमान 3,300 किलो अंमली पदार्थांचा साठा जप्‍त कर्‍यात आला होता. याचे आंतरराष्ट्रीय बाजारातील मूल्‍य 2,000 कोटी रुपयांहून अधिक होते.

हेही वाचा :

Back to top button