Pm Modi On Tourism: पर्यटनाला चालना देण्यासाठी पंतप्रधान मोदींचा नवा ‘मंत्र’; मंत्रालयाकडून काम सुरू

Prime Minister Modi
Prime Minister Modi

पुढारी ऑनलाईन: गेल्या दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पोस्ट बजेट वेबिनार दरम्यान पर्यटन विकासाला गती देण्यासाठी सूचना मागितल्या होत्या. यामध्‍ये पर्यटन मंत्रालय, सांस्कृतिक मंत्रालय तसेच अन्य काही मंत्रालये तसेच राज्यांच्या पर्यटन उद्योगाशी संबंधितांचा समावेश होता.

यावर्षी देशाच्या पर्यटनाचे एक नवीन चित्र उभा राहणार आहे. हे चित्र देशातील निवडलेल्या पन्नास पर्यटन स्थळांचे असणार आहे. ज्यामध्ये समुद्रकिनारा, वन्यजीव,  सांस्कृतिक, हिमालय आणि आध्यात्मिक पर्यटन यांसारख्या अनेक पर्यटन स्थळांची ओळख जगाला करून दिली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यटनाला चालना देण्यासाठी यावर विशेष भर देण्यास अधिकाऱ्यांना सांगितले आहे. याप्रसंगी त्यांनी कतारचे उदाहरण दिले, त्यांनी येथे आयोजित होत असलेल्या फिफा फूटबॉल विश्वचषकामुळे या देशाने पर्यटनाला एक नवी उंची मिळवून दिली आहे.

G-20 परिषदेमुळे देशाचे पर्यटन बूस्ट

पंतप्रधान मोदींनी देशात आयोजित करण्यात येणार्‍या विविध कार्यक्रमांमधून पर्यटनाला चालना देण्यासाठी देखील धोरण आखण्यास सांगितले आहे. पर्यटन मंत्रालय आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या मतानुसार, पुढच्या काही महिन्यात भव्य पर्यटन स्थळे विकसित होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतात G-20 परिषद आयोजनासह देशाच्या पर्यटन मंत्रालयाला देखील बूस्टर मिळत असल्याचे पर्यटन मंत्रालातील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

 अर्थसंकल्पात २४०० कोटींची तरतूद

यंदाच्‍या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने पर्यटन मंत्रालयासाठी २४०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे देशातील पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार आहे. पर्यटन सचिव अरविंद सिंह यांनी म्हटले आहे की, पर्यटन मंत्रालय पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या सूचनेनुसार देशाला पर्यटनात अव्वल असलेल्या व्हिजनला पुढे नेण्यासाठी पाठपुरावा करण्यात गुंतले आहे.केवळ राज्यस्तरीय नाही तर, सार्वजनिक आणि खाजगी स्तरावर देखील मोहिमेच्या माध्यमातून पर्यटन वाढवले जात आहे.

काय आहे व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम?

व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम अंतर्गत सीमावर्ती गावांमध्ये पर्यटनाच्या मूलभूत सुविधा पुढे आणल्या जात आहेत. लग्नाच्या पर्यटनासह मोठ्या कार्यक्रमांद्वारे पर्यटनाला चालना देण्यासाठी हेच संबंधित राज्ये आणि स्वतंत्र मंत्रालयांशी समन्वय साधला जात असल्याचे देखी पर्यटन मंत्रालातील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news