PM Modi Lakshadweep Visit : पंतप्रधान मोदींच्या ‘लक्षद्वीप’ दौर्यावर मालदीवच्या मंत्र्यांची वादग्रस्त पाेस्ट
पुढारी ऑनलाईन डेस्क: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लक्षद्वीपला भेट दिली. या भेटीची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली. यावरुन आतामालदीव आणि लक्षद्वीपची तुलना सुरू झाली. यानंतर पीएम मोदींनी देशवासियांना देखील लक्षद्वीपला भेट देण्याचे आवाहन केले. याची आता मालदीव सरकारला काळजी वाटू लागली. मालदीवमधील मंत्री आणि नेत्यांनी पीएम मोदींवर टीका करण्यास सुरूवात केली. प्रकरणाबाबत मालदीवच्या एका मंत्र्याने केलेल्या पोस्टवरून वाद निर्माण झाला आहे. या मुद्द्यावरून दोन्ही देशांचे युजर्स आपसात भिडले आहेत. (PM Modi Lakshadweep Visit)
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडे लक्षद्वीपला भेट दिली आणि समुद्रकिनाऱ्यावरील बरेच फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि चाहत्यांना लक्षद्वीपला भेट देण्याचे आवाहन केले. पीएम मोदींच्या या पुढाकारानंतर हा केंद्रशासित प्रदेश सर्च इंजिन साइटवर ट्रेंड करू लागला. मालदीवच्या काही सत्ताधारी नेत्यांना पंतप्रधान मोदींनी भारतातील पर्यटनाला चालना दिलेली पसंती आवडली नाही. त्यामुळे त्यांनी पीएम मोदी, भारत आणि भारताच्या पर्यटनावर टीका केली आहे. (PM Modi Lakshadweep Visit)
आमच्यासोबतच्या स्पर्धेला काठीण्यपातळीवर सामोरे जावे लागेल-मालदीव मंत्री
मालदीवचे मंत्री अब्दुल्ला मोहजुम मजीद यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, 'मालदीवच्या पर्यटनाला महत्त्व दिल्याबद्दल मी भारतीय पर्यटनाला शुभेच्छा देतो. परंतु भारताला आमच्यासोबतच्या पर्यटन स्पर्धेला काठीण्यपातळीवर सामोरे जावे लागेल. आमची एकट्या रिसॉर्टची पायाभूत सुविधा त्यांच्या संपूर्ण पायाभूत सुविधांपेक्षा जास्त आहे. ही पोस्टमध्ये मालदीवचे मंत्री मजीद यांनी पीएम मोदींनाही टॅग केली आहे. (PM Modi Lakshadweep Visit)
आमच्याशी स्पर्धा करणे हा भ्रम : झाहिद रमीझ
मालदीवचे आणखी एक नेते झाहिद रमीझ यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींनी लक्षद्वीपमध्ये पर्यटन वाढवण्याबाबत लिहिले, 'नक्कीच हे एक चांगले पाऊल आहे, पण आमच्याशी स्पर्धा करणे हा भ्रम आहे. ते आमच्यासारखी सेवा कशी देणार? शिवाय मधोमध स्वच्छ कसे राहता येईल? खोल्यांमध्ये नेहमी उपस्थित असलेला वास हे देखील सर्वात मोठे आव्हान आहे, अशी खालच्या पातळीवर भारत आणि मालदीव मधील पर्यटनाची तुलना मालदीवचे नेतेकककककककककककककककककककककककककककककककक झाहिद रमीझ यांनी केली आहे. (PM Modi Lakshadweep Visit)
PM मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्याची मालदीवला हेवा, #boycottmaldives टॅग ट्रेंडवर
मालदीवच्या युवा सशक्तीकरण उपमंत्री मरियम शियुना यांनी इंस्टाग्रामवर एका पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'जोकर' आणि 'कठपुतली' म्हटले होते. विरोध केल्यानंतर त्यांना त्यांची पोस्ट हटवावी लागली. मात्र यानंतर सोशल मीडियावर वातावरण चांगलेच तापले असून भारतातील नेटिझन्सकडून मालदीवमधील नेत्यांच्या बोलण्याचा निषेध म्हणून #boycottmaldives हा टॅग मोठ्या प्रमाणात ट्रेंडवर आला आहे.
भारत-मालदीव संबंधात तणाव
भारत आणि मालदीव हे जवळचे मित्र आहेत; पण अलीकडच्या काळात दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये काही प्रमाणात तणाव निर्माण झाला आहे. वास्तविक नोव्हेंबर 2023 मध्ये मालदीवमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मोहम्मद मुइज्जू विजयी झाले आहेत. मुइज्जू हे चीनच्या जवळचे मानले जातात. त्यामुळेच विजयानंतर लगेचच मुइज्जूने मालदीवमध्ये तैनात भारतीय लष्कर मागे घेण्याची घोषणा केली होती. मुइझूने मालदीवच्या इंडिया फर्स्ट धोरणातही बदल केला आहे. आता पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर भारतातील सोशल मीडिया यूजर्स लोकांना मालदीव ऐवजी लक्षद्वीपला जाण्याचे आवाहन करत आहेत. अशा परिस्थितीत पर्यटनावर आधारित मालदीवच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळेच मालदीव सरकारचे लोकही भारत आणि पंतप्रधान मोदींवर टीका करत आहेत.
मालदीवच्या द्वेषपूर्ण कमेंटमुळे बॉलिवूडमधून देखील नाराजीचा सूर
आजकाल मालदीव हे भारतीयांसाठी आवडते व्हॅकेशन स्पॉट बनले आहे. सर्वसामान्यांपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटी मालदीवमध्ये फिरत असतात. मात्र आता भारत आणि मालदीवमध्ये वाद सुरू झाला आहे. दरम्यान या वादावर बॉलिवूडमधून देखील नाराजीचा सूर उमटत आहे. अभिनेता अक्षय कुमार आणि सलमान खानसह अनेक सेलिब्रिटींनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. बॉलीवूड स्टार अक्षय कुमारने केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "मालदीवमधील प्रमुख सार्वजनिक व्यक्तींनी भारतीयांविरुद्ध द्वेषपूर्ण आणि वर्णद्वेषी टिप्पण्या केल्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते ज्या देशात सर्वाधिक पर्यटक येतात त्या देशात हे करत आहेत. मी अनेक वेळा मालदीवला भेट दिली आहे आणि नेहमीच त्याचे कौतुक केले आहे, परंतु सन्मान प्रथम येतो. चला भारतीय बेटांचा शोध घेण्याचे ठरवूया आणि आपल्या स्वत: च्या पर्यटनाला पाठिंबा देऊया, असे आवाहन देखील अक्षय कुमार यांनी पर्यटकांना केले आहे.
'हे आपल्या भारतात आहे' – अभिनेता सलमान खान
या वादावर प्रतिक्रिया देताना सलमान खानने म्हटले आहे की, "आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना लक्षद्वीपच्या सुंदर, स्वच्छ आणि विस्मयकारक समुद्रकिनाऱ्यावर पाहून खूप आनंद झाला आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे आपल्या भारतात आहे".
जॉन अब्राहमनचीही प्रतिक्रिया
'पठाण' फेम अभिनेता जॉन अब्राहमने सुंदर भारतीय समुद्रकिनाऱ्यांची छायाचित्रे शेअर केली आणि लिहिले आहे की, "आश्चर्यकारक! भारतीय आदरातिथ्यासह, "अतिथी देवो भव" ची कल्पना आणि विशाल सागरी जीवन एक्सप्लोर करते, असे म्हणत जॉन याने लक्षद्वीप हे पाहण्यासारखे ठिकाण आहे." असे देखील स्पष्ट केले आहे.