PM मोदींनी लक्षद्वीपमध्‍ये अनुभवले ‘शुद्ध आनंदाचे क्षण’! ‘स्नॉर्कलिंग’चाही लुटला आनंद | पुढारी

PM मोदींनी लक्षद्वीपमध्‍ये अनुभवले 'शुद्ध आनंदाचे क्षण'! 'स्नॉर्कलिंग'चाही लुटला आनंद

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी लक्षद्वीप दाैर्‍यावेळी तेथील निसर्गाच्‍या सानिध्‍यात व्‍यतित केलेल्‍या क्षणांचे फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर शेअर केले आहेत. मूळ समुद्रकिनाऱ्यांवर पहाटे चालणे हे “शुद्ध आनंदाचे क्षण” होते, असेही त्‍यांनी आपल्‍या पाेस्‍टमध्‍ये नमूद केले आहे. ( PM Modi enjoys time on beach in Lakshadweep )

आणखी कठोर परिश्रम कसे करावे, यावर विचार करण्याची संधी मिळाली

लक्षद्वीपच्या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1,150 कोटी रुपयांच्‍या विविध विकास प्रकल्‍पाचे उद्‍घाटन केले. येथून परल्‍यानंतर त्‍यांनी द्वीपसमूहाची छायाचित्रे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर शेअर केली आहेत. त्‍यांनी आपल्‍या पोस्‍टमध्‍ये म्‍हटले आहे की, “लक्षद्वीपच्या शांततेने त्यांना 140 कोटी भारतीयांच्या कल्याणासाठी आणखी कठोर परिश्रम कसे करावे, यावर विचार करण्याची संधी दिली.” ( PM Modi enjoys time on beach in Lakshadweep )

“माझ्या मुक्कामादरम्यान, मी स्नॉर्केलिंग करण्‍याचा देखील प्रयत्न केला. हा अनुभव किती आनंददायक होता!, तुम्‍हाला साहसाची आवड असेल तर भेट देणार्‍या ठिकाणांमध्‍ये लक्षद्वीप तुमच्या यादीत असणे आवश्यक आहे, असेही पंतप्रधान मोदींनी आपल्‍या पाेस्‍टमध्‍ये नमूद केले आहे.

लक्षद्वीप हा केवळ बेटांचा समूह नाही; तो परंपरांचा कालातीत वारसा

लक्षद्वीप हा केवळ बेटांचा समूह नाही; तो परंपरांचा कालातीत वारसा आहे. तसेच तेथील लोकांच्या भावनेचा दाखला आहे. लक्षद्वीप भेटीवेळी अगट्टी, बंगाराम आणि कावरत्ती येथील रहिवाशांबराेबर संवाद साधला. आदरातिथ्याबद्दल त्यांचे आभार मानले. लक्षद्वीपचा प्रवास हा एक समृद्ध प्रवास होता, असेही पंतप्रधान माेदींनी म्‍हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केलेल्‍या फोटोमध्‍ये लक्षद्वीपच्या निसर्गासह ते समुद्रात स्नॉर्कलिंग करताना पाहायला मिळतात. ( PM Modi enjoys time on beach in Lakshadweep )

हेही वाचा : 

 

Back to top button