PM Modi On Aditya-L1 Mission: ‘आदित्य एल-१’ ची ऐतिहासिक झेप! PM मोदींकडून इस्रो शास्त्रज्ञांचे विशेष अभिनंदन | पुढारी

PM Modi On Aditya-L1 Mission: 'आदित्य एल-१' ची ऐतिहासिक झेप! PM मोदींकडून इस्रो शास्त्रज्ञांचे विशेष अभिनंदन

पुढारी ऑनलाईन डेस्क : Aditya-L1 – Spacecraft भारताचे सूर्ययान ‘आदित्य एल-१’ ने लॅग्रेंज पॉईंट१ (L1) वर आज (दि.६) ऐतिहासिक झेप घेतली. या ऐतिहासिक कामगिरीनंतर पीएम मोदी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पीएम मोदींनी ‘आदित्य एल-१’ मोहीमेच्या यशासाठी इस्रो शास्त्रज्ञांचे विशेष अभिनंदन केले. या संदर्भातील पोस्ट पीएम मोदी यांनी त्यांच्या अधिकृत ‘X’ अकाउंटवर केली आहे. (PM Modi On Aditya-L1 Mission)

मानवतेच्या हितासाठी विज्ञानाच्या नवीन सीमांचा पाठपुरावा करत राहू- पीएम मोदी

पीएम मोदी यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, भारताने आणखी एक मैलाचा टप्पा गाठला आहे. भारतातील पहिली सौर वेधशाळा आदित्य-L1 गंतव्यस्थानावर पोहोचली आहे. याबद्दल आमच्या शास्त्रज्ञांच्या अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या अंतराळ मोहिमा साकारण्याच्या अथक समर्पणाचा हा पुरावा आहे. या विलक्षण पराक्रमाचे कौतुक करण्यात मी राष्ट्रासोबत आहे. आम्ही मानवतेच्या हितासाठी विज्ञानाच्या नवीन सीमांचा पाठपुरावा करत राहू, असेही पीएम मोदी यांनी म्हटले आहे. (PM Modi On Aditya-L1 Mission)

भारताने अवकाश संशोधनात नवीन इतिहास रचला

भारताचे सूर्ययान आदित्य-L1 चा प्रवास 2 सप्टेंबर 2023 रोजी PSLV-C57 च्या प्रक्षेपणाने सुरू झाला. यानंतर आज 110 दिवसांच्या संक्रमणानंतर हे अंतराळयान आता प्रभामंडलच्या अंतिम कक्षेत प्रवेश पोहचले. त्यानंतर यानाने पृथ्वी आणि सूर्याच्यामध्ये असलेल्या फायनल हॅलो ऑर्बिटमध्ये प्रवेश करत, लॅग्रेंज पॉईंट१ (L1) वर यशस्वी झेप घेतली. हा टप्पा पृथ्वी आणि सूर्याच्या गुरूत्त्वाकर्षणात असलेल्या L1 पॉईंटवर येते. या टप्प्यावर सूर्य आणि पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल समान आहे. त्यामुळे L1 हा पॉईंट निवडण्यात आला आहे. या मोहीमेच्या यशामुळे भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो आणि भारताने अवकाश संशोधनात नवीन इतिहास रचला आहे. (PM Modi On Aditya-L1 Mission)

भारतासाठी गौरवशाली वळण- केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री

चंद्र चालण्यापासून सूर्य नृत्यापर्यंत! हे भारतासाठी गौरवशाली वळण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली टीम #ISRO द्वारे स्क्रिप्ट केलेली आणखी एक यशोगाथा. सूर्य-पृथ्वी कनेक्शनचे रहस्य शोधण्यासाठी #AdityaL1 त्याच्या अंतिम कक्षेत पोहोचल्याचे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी म्हटले आहे.

हेही वाचा:

 

Back to top button