PM Modi Himachal Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुग्णवाहिकेसाठी भररस्त्यावर ताफा थांबवला! (VIDEO)

PM Modi Himachal Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुग्णवाहिकेसाठी भररस्त्यावर ताफा थांबवला! (VIDEO)
Published on
Updated on

शिमला; वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Himachal Visit) यांनी एका रुग्णवाहिकेला मार्ग मोकळा करून देण्यासाठी त्यांचा ताफा कडेला थांबवल्याची घटना हिमाचल प्रदेशातील कांगडा येथे बुधवारी घडली. रुग्णवाहिका मार्गस्थ झाल्यानंतरच पंतप्रधानांचा ताफा पुढे सरकला. पंतप्रधानांचा ताफा रस्त्यावर अचानक थांबल्याने हिमाचल पोलिस आणि गुप्तचर यंत्रणांमध्ये एकच खळबळ उडाली होती.

कांगडा येथील चंबी मैदानावर भाजप उमेदवारांसाठीच्या प्रचार सभेनंतर पंतप्रधान मोदी गग्गल विमानतळावर परतत असताना ही घटना घडली. मोदींना रस्त्याच्या कडेला एक रुग्णवाहिका उभी दिसली. (PM Modi Himachal Visit)

मोदींनी तत्काळ आपला ताफा थांबवला आणि आधी रुग्णवाहिकेला मार्ग देण्यास सांगितले. रुग्णवाहिका तांडा येथील डॉ. राजेंद्र प्रसाद वैद्यकीय महाविद्यालयातून एका 43 वर्षांच्या महिलेचा मृतदेह घरी पोहोचविण्यासाठी निघालेली होती. पंतप्रधानांचा ताफा येत असल्याने इतर वाहनांसह रुग्णवाहिकाही पोलिसांनी रस्त्याच्या कडेला थांबविली होती. (PM Modi Himachal Visit)


अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news