

पुढारी ऑनलाईन डेस्क : टी 20 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना काही दिवसांवर आला असतानाच आयपीएल 2023 च्या (IPL Auction 2023) तयारीला जोरात सुरुवात झाली आहे. आयपीएल लिलावाच्या तारखेची अनेक दिवसांपासून क्रिकेट चाहते वाट पाहत होते. आतापर्यंत १६ डिसेंबरलाच लिलाव होणार असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र आता डिसेंबरच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात लिलाव होणार नसल्याचे जाहीर झाले आहे. त्याचबरोबर यापूर्वी लिलावाचे ठिकाण म्हणून अनेक शहरांची नावे पुढे येत होती, परदेशातही लिलाव होणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र बीसीसीआयने मोठा निय्णय घेत आयपीएल 2023 च्या लिलाव कार्यक्रमाचे ठिकाण निश्चित केले आहे.
आयपीएल २०२३ साठी लिलाव आयोजित केला जाणार आहे. (IPL Auction 2023) ज्यामध्ये संघांकडून खेळाडूंना खरेदी केले जाईल. गेल्या वर्षी संघांची संख्या आठवरून दहावर आणताना मेगा लिलाव झाला आणि संघांना मोजकेच खेळाडू कायम ठेवण्याची परवानगी देण्यात आली. आयपीएल २०२३ साठी लिलाव २३ डिसेंबर रोजी कोची येथे होणार आहे. लिलाव भारताबाहेर असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र आता मिनी लिलाव भारतातच होणार असल्याचे निश्चित झाले आहे. याआधी आयपीएलचे लिलाव हे बंगळुरू किंवा कोलकाता येथे झाले होते. पहिल्यांदाच लिलाव कोची येथे होणार आहे.
दरम्यान, तुम्हाला माहिती असेल की आयपीएलच्या सर्व दहा संघांना रिलिज करणाऱ्या खेळाडूंची यादी १५ नोव्हेंबरपर्यंत बीसीसीआयकडे सादर करायची आहे. जवळपास सर्वच संघांनी आपली यादी तयार केली असून ती अद्याप निश्चित व्हायची असल्याचे सांगण्यात येत आहे. टी-२० विश्वचषक २०२२ चा अंतिम सामना १३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यानंतर आयपीएलमध्ये खेळणाऱ्या सर्व मोठ्या खेळाडूंनाही विश्रांती मिळणार आहे. अनेक आयपीएल संघांचे कर्णधार सध्या टीम इंडियाच्या वतीने टी-२० विश्वचषक खेळत आहेत.
टीम मॅनेजमेंट संघाच्या कर्णधाराशी चर्चाकरून खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सोपवली जाईल, असे सांगण्यात येते. असे मानले जाते की १५ नोव्हेंबरच्या संध्याकाळी ही यादी समोर येईल, जेणेकरून चाहत्यांना हे देखील कळू शकेल की त्यांच्या संघाने कोणता खेळाडू कायम ठेवला आहे आणि कोणाला रिलिज केले आहे. दरम्यान, लिलावाच्या तारखेला आता फारसा वेळ नाही, अशा परिस्थितीत आयपीएलचा थरार चाहत्यांना पुन्हा एकदा डोकेवर काढणार आहे.
हेही वाचा;