sharayu sonawane : पिंकीचा विजय असो फेम शरयू सोनावणे विषयी माहिती आहे का?

sharayu sonawane
sharayu sonawane
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या वाहिनीवरील मालिका 'पिंकीचा विजय असो' (pinkicha vijay aso) मध्ये अभिनेत्री शरयू सोनावणे दिसतेय. तिने (sharayu sonawane) पिंकीची भूमिका साकारलीय. पिंकीला फिल्मी विश्व आवडतं. तिच्या वागण्यातून ते वेळोवेळी जाणवत असतं. ती मोठी स्वप्न बघते. ती इंग्रजी बोलते पण वेगळ्या स्टाईलने. हर्षद नायबळने तिच्या लहान भावाची भूमिका या मालिकेत साकारलीय. पण, पिंकी खऱ्याखुऱ्या आयुष्यात कशी आहे माहिती आहे का? मालिकेतील पिंकी खूप बडबडी आहे. पण शरयू रिअल लाईफमध्ये खूप शांत आहे.  (sharayu sonawane)

शरयू मुळची मुंबईची

शरयू मुळची मुंबईची आहे. तिला आधीपासून नृत्याची आवड आहे. तिने भरतनाट्यमचेही प्रशिक्षण घेतले आहे. शिवाय तिने बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासोबतही डान्स केला आहे, हेमामालिनी यांच्यासोबत यशोदा-कृष्ण बॅले करायचे ज्यात मी नृत्यामधून कृष्ण साकारला आहे.

तिची जन्म १२ जानेवारीला मुंबईत झाला. तिला शरू म्हणूनही बोलावले जाते. झी युवा वाहिनीवरील मालिका प्रेम पॉईझन पंगामध्ये तिने काम केलंय. भावना कॉलेज अंधेरीतून तिने पदवीचे शिक्षण घेतले आहे. अमोल पाडवेंच्या आटली बाटली फुटली या चित्रपटातून तिने पदार्पण केले होते. गौरव रॉय यांच्या Ove Janiya' या म्युझिक व्हिडिओमध्येही तिने काम केलंय.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news