घोटाळेबाज अनेक लोकांना ही लिंक पाठवत आहेत आणि नवीन खास अशी वैशिष्ट्ये असलेल्या व्हॉट्स अॅपचे नवीन रूप मिळविण्यासाठी त्यांना अॅप डाउनलोड करण्यास सांगत आहेत. मुंबई पोलिसांनी याबाबत इशारा दिला आहे. त्यांनी त्याला व्हायरस म्हटले आहे. त्यांच्या सल्ल्यानुसार, अधिकाऱ्यांनी प्लॅटफॉर्मशी जोडलेल्या या नवीन फसवणुकीबद्दल लोकांना सल्ला दिला आहे की, त्यांनी लिंकवर क्लिक करू नये किंवा अॅप डाउनलोड करू नका, असे आवाहन केले आहे. पोलिसांनी पुढे असेही सांगितले आहे की, या लिंकवर क्लिक केल्यास वापरकर्त्याच्या फोनवर फिशिंग हल्ला होतो, ज्याद्वारे संवेदनशील माहिती चोरली जाते किंवा स्कॅमरला वापरकर्त्याच्या डिव्हाइसचे नियंत्रण मिळते.