Aishwarya Narkar Photo : सौंदर्य शक्ती तर स्मितहास्य तलवार…; ऐश्वर्याची मोहक अदा

Aishwarya Narkar
Aishwarya Narkar
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: मालिका, नाटक, चित्रपट या तिन्ही क्षेत्रात ऐश्वर्या नारकरने आपल्या अभिनयाची मोहर उमठवली आहे. सध्या तिच्या मराठमोळ्या साडीतील लूकने सर्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. ( Aishwarya Narkar Photo)

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर ( Aishwarya Narkar ) गेली अनेक वर्ष आपल्या अभिनयाने खास ठसा उमठवला आहे. ऐश्वर्याने नुकतेच पन्नाशीचा टप्पा ओलांडला यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. कारण तिच्या लूकची सर्वत्र चर्चा होत आहे. आजही ऐश्वर्याच्या सौदर्याची जादू चाहत्यामध्ये पसरलेली आहे. याच दरम्यान ऐश्वर्याने तिच्या इन्स्टाग्रामवर साडीतील वेगवेगळ्या लूकमधील मोहक अंदाजात फोटोशूट ( Aishwarya Narkar Photo) केलं आहे. यात सॉफ्ट कॉटन प्रकारच्या निळ्या काठाची साडी नेसून फोटोशूटने चाहत्याचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी तिने केसांच्या वेणी, बिंदी आणि मेकअपने तिच्या सौदर्यात भर घातली.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'Inhale the future…,Exhale the past….♥️♥️'. असे म्हटले आहे. यावरून तिने भविष्याचा वेध ध्या आणि भूतकाळात घटलेल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा असा सल्ला दिला आहे. याआधीही तिने ब्लॅक अॅन्ड व्हाईट रंगातील काही फोटो शेअर केले आहेत. यासिवाय तिने गुलबट रंगाच्या साडीमध्ये देखील हटके पोझ दिली आहे. ऐश्वर्याच्या इन्स्टाग्रामवर तिचे नवनविन साडीतील फोटो पाहायला मिळतात. हे फोटो चाहत्याच्या पंसतीस उतरले आहेत.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात एका युजर्सने खूप छान…., मस्त, अप्रतिम, खूप खूप सुंदर आहेस, मराठीची अप्सरा, जर सौंदर्य ही तुझी शक्ती आहे तर स्मितहास्य ही तुझी तलवार आहे, ये सवालिया आँखे और अफीम सी बिंदी, ये चाहती कुछ और है और बोलती कुछ और.., आईने में देखो की सिर्फ आप ही खूबसूरत हो. तर दुसऱ्या एका युजर्सने Graceful smile, Nice, Superb, सLai bhari❤, असे म्हटले आहे. याशिवाय काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत. ऐश्वर्याच्या या फोटोला आतापर्यत्न ५ हजाराहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news