Norway | नार्वेत सापडला मोठा खजिना, १०० वर्षे जगाला होईल फायदा, जाणून घ्या त्याबद्दल

Norway | नार्वेत सापडला मोठा खजिना, १०० वर्षे जगाला होईल फायदा, जाणून घ्या त्याबद्दल

पुढारी ऑनलाईन डेस्क : नॉर्वे या देशात गेल्या महिन्यात फॉस्फेटचा मोठा साठा सापडला. हे फॉस्फेटचे साठे पुढील १०० वर्ष सौर पॅनेल आणि बॅटरीसाठी जगाची मागणी पूर्ण करू शकतील, असा दावा नॉर्गे मायनिंग या खाण कंपनीने केला आहे. या कंपनीने २०१८ मध्ये नैऋत्य नॉर्वेमध्ये फॉस्फेटचे साठे शोधले होते. आता या कंपनीनी तब्बल ७० अब्ज टनांपर्यंतचा साठा शोधला आहे.

नॉर्वेतील खाण कंपनीच्या म्हणण्यानुसार, गेल्या महिन्यात सापडलेल्या फॉस्फेट रॉकचा साठा पुढील १०० वर्षांसाठी जगाची मागणी पूर्ण करू शकेल. हा साठा किमान ७० अब्ज टन असल्याचा अंदाज आहे. नैऋत्य नॉर्वेमध्ये हे साठे सापडले आहेत. त्याचबरोबर तिथे टायटॅनियम आणि व्हॅनेडियम सारख्या खनिजांचे देखील साठे आहेत.

फॉस्फेट खडकामध्ये फॉस्फरसचे उच्च प्रमाण असते. त्यामुळे खत उद्योगासाठी फॉस्फरस तयार करण्यासाठी खनन केलेल्या फॉस्फेट खडकाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. परंतु फॉस्फेट मधून तयार होणाऱ्या ऊर्जेची घनता उच्च असल्याने शिवाय हे खनिज सुरक्षित आणि जादा टीकणारे असल्याने त्याचा वापर सौर पॅनेल, लिथियम बॅटरी, सेमीकंडक्टर आणि संगणक चिप्सच्या उत्पादनात केला जातो. त्याचा वापर फक्त इलेक्ट्रिक वाहने आणि खत बनवण्यासाठी केला तर जगाच्या गरजा पुढील ५० वर्षे भागवता येतील. फॉस्फेट रॉक हा फॉस्फरसच्या उत्पादनातील महत्त्वाचा घटक आहे, जो हरित तंत्रज्ञानाच्या विकासासाठी आवश्यक आहे. मात्र, जगात फॉस्फेटचा पुरवठा सध्या आव्हानांचा सामना करत आहे. या कारणास्तव नॉर्वेमध्ये लावलेला शोध अधिक महत्त्वाचा मानला जात आहे.

फॉस्फेटचा शोध कसा लागला?

१६६९ मध्ये जर्मन शास्त्रज्ञ हेनिग ब्रँड यांनी याचा शोध लावला. यानंतर, फॉस्फरसच्या वापरामुळे तंत्रज्ञानाची प्रगती होण्यास मदत झाली. धातूंचे सोन्यात रूपांतर करण्यासाठी ते सुरुवातीला फिलॉसॉफर्स स्टोन शोधत होते पण त्यांचे प्रयत्न व्यर्थ ठरला. सध्या याचा वापर इलेक्ट्रॉनिक वाहने, सौर पॅनेल, संगणक चिप्स आणि लिथियम-लोह फॉस्फेटमध्ये केला जातो.

रशियाकडे आहे सर्वात मोठा साठा

रशियामध्ये शुद्ध फॉस्फेटचा सर्वात मोठा साठा आहे. परंतु जेव्हापासून रशियाने युक्रेनवर आक्रमण केले तेव्हापासून फॉस्फेटची पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. युरोपियन देश फॉस्फेट खडकांच्या आयातीवर अवलंबून आहेत. बहुतेक फॉस्फेट खडक चीन, इराक आणि सीरियासारख्या देशांतून येतात. मात्र, नॉर्वेच्या या शोधाचा युरोपीय देशांवरच नव्हे तर जगावरही परिणाम होणार आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news