PM Modi’s France visit | २६ राफेल विमाने, ३ स्कॉर्पिन पाणबुड्या, पीएम मोदींच्या फ्रान्स दौऱ्यात होणार करार | पुढारी

PM Modi's France visit | २६ राफेल विमाने, ३ स्कॉर्पिन पाणबुड्या, पीएम मोदींच्या फ्रान्स दौऱ्यात होणार करार

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : भारत फ्रान्सकडून २६ राफेल एम नौदल जेट आणि तीन अतिरिक्त स्कॉर्पिन पाणबुड्या खरेदी करण्याच्या करांरावर स्वाक्षरी करण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १४ ते १६ जुलै दरम्यान होणाऱ्या फ्रान्स दौऱ्यादरम्यान या करारांची घोषणा होणे अपेक्षित आहे. संरक्षण खरेदी मंडळाने (DPP) सोमवारी या करांराना मंजुरी दिली. (PM Modi’s France visit)

या करारांत सुमारे ९० हजार कोटी रुपयांच्या २६ राफेल एम विमानांचा समावेश असेल. ज्यात २२ सिंगल-सीटर आणि चार डबल-सीटर ट्रेनर व्हर्जन्स असतील. सरकारी सुत्रांच्या माहितीनुसार, तीन अतिरिक्त पाणबुड्या प्रकल्प ७५ अंतर्गत असलेल्या स्कॉर्पिन कराराचा भाग असतील.

राफेल विमाने भारतीय नौदलाच्या विमानवाहू जहाजांवर तैनात करण्यासाठी आहेत आणि या आठवड्यात त्याला संरक्षण मंत्रालयाकडून मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. भारतीय नौदलाला अलिकडील काही वर्षांत विमान आणि पाणबुड्यांची कमतरता जाणवत आहे. त्यासाठी ही तातडीची गरज पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.

भारतीय नौदलाद्वारे या विमानांचा वापर आयएनएस विक्रांत आणि आयएनएस विक्रमादित्य या विमानवाहू युद्धनौकेवर केला जणार आहे. सध्या या ठिकाणी मिग-२९ चा वापर केला जातो. फ्रान्समध्ये अधिकृतपणे घोषणा होण्यापूर्वी पुढील काही दिवसांत संरक्षण अधिग्रहण परिषदेसमोर या करारांचे सादरीकरण केले जाण्याची शक्यता आहे.

फ्रान्समधील पॅरिस येथे १४ जुलै रोजी होणाऱ्या बॅस्टिल डे परेडला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. भारतीय लष्कराच्या पंजाब रेजिमेंटसह भारतीय नौदल, भारतीय हवाई दलाच्या तुकड्या या परेडमध्ये सहभागी होणार आहे. (PM Modi’s France visit)

हे ही वाचा :

Back to top button