‘पीएफआय’ ही संघटना ‘सायलेंट किलर’ : देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस ( संग्रहित छायाचित्र )
देवेंद्र फडणवीस ( संग्रहित छायाचित्र )

पुढारी ऑनलाईन डेस्क :  पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया( पीएफआय ) या संघटनेचे दहशतवाद्यांशी कनेक्शन असल्याचे तपास यंत्रणांच्या चौकशीतून समोर आल्याने केंद्र सरकारने या संघटनेवर ५ वर्षांची बंदी घातली आहे. महाराष्ट्रातही 'पीएफआय' संघटनेनवर योग्य कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना आज (दि. २८) दिली.

पीएफआय संघटनेने आर्थिक नेटवर्क उभे केले होते. त्यासाठी खाती काढण्यात आली होती. त्यामध्ये गोपनीयरित्या पैसा जमा केला जात असल्याची माहिती यंत्रणांना मिळाली आहे. ही संघटना सायलेंट किलर म्हणून काम करत होती. या संघटनेच्या माध्यमातून दुष्प्रचार सुरू होता. त्यांच्या कुरापतीचे पुरावे यंत्रणांना मिळाले होते. त्यामुळे या संघटनेशी सबंधित संस्थांवरही मोठी कारवाई करण्यात येणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news