EPFO : पीएफ खातेधारकांना ३१ डिसेंबरनंतरही ई- नॉमिनेशन करता येणार

EPFO : पीएफ खातेधारकांना ३१ डिसेंबरनंतरही ई- नॉमिनेशन करता येणार

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा

पीएफ खातेधारकांना ई- नॉमिनेशन करण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) 31 डिसेंबर ही मुदत दिली होती. मात्र या तारखेनंतरही ई-नॉमिनेशन करता येईल, असे ईपीएफओ कडून स्पष्ट करण्यात आले आहे. ई- नॉमिनेशनद्वारे खातेधारकांना (PF account holders) आपल्या खात्याशी नॉमिनी जोडता येऊ शकतो.

31 डिसेंबरनंतरही ई- नॉमिनेशन करता येणार असले तरी ही प्रक्रिया कधीपर्यंत सुरू राहील, हे मात्र ईपीएफओकडून (EPFO) सांगण्यात आलेले नाही. ईपीएफओच्या ऑनलाइन पोर्टलवर डाउनलोड होण्यासह अनेक समस्या उद्भवल्याच्या तक्रारी खातेदारांनी केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ई- नॉमिनेशनला मुदतवाढ देण्यात आली आहे.

दरम्यान, जीवन विमा पॉलिसी (Life Insurance Policy) चा प्रीमियम वेळत भरला नाही तर विमा कव्हर संपण्याचा धोका असतो. कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. या काळात उद्योग ठप्प झाले होते. यामुळे अनेकांना विमा पॉलिसीचा प्रीमियम भरण्यास अडचणी आल्या. पण आता प्रीमियम भरण्याचा सुरक्षित पर्याय आहे. तो म्हणजे तुम्ही LIC चा प्रीमियम कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) अकाउंटमधून भरु शकता. EPFO ने काही अटींवर ईपीएफ खात्यातून एलआयसी प्रीमियम भरण्याची मूभा दिली आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news