पेट्रोल-डिझेल स्‍वस्‍त होणार? पेट्रोलियम मंत्र्यांनी दिले उत्तर…

पेट्रोल-डिझेल स्‍वस्‍त होणार? पेट्रोलियम मंत्र्यांनी दिले उत्तर…

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पेट्रोल आणि डिझेलच्‍या किंमती कमी होणार का, हा देशातील सर्वसामान्‍यांच्‍या मनातील प्रश्‍नाचे  उत्तर आज ( दि. १० ) पेट्रोलियम मंत्री ( Petroleum Minister )  हरदीप सिंग पुरी यांनी  दिले.

भारतीय जनता पक्षाच्‍या मुख्‍यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना हरदीप सिंग पुरी म्‍हणाले की,आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत स्थिर राहिल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याचा विचार केला जाऊ शकतो. तेल कंपन्या सध्‍या अशा स्थितीत आहेत की, पेट्रोल-डिझेल किंमत कमी करण्‍याबाबत योग्‍य निर्णय घेतला जावू शकतो.

मागील तीन महिने  पेट्रोलियम कंपन्‍यासाठी सकारात्‍मक राहिले आहेत. त्‍यांनी नुकसान पूर्णपणे भरुन काढले आहे. तसेच नरेंद्र मोदींच्या सरकारने एप्रिल २०२२ पासून तेलाच्या किमती वाढवल्या नाहीत. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याचा सामान्य जनतेवर परिणाम होणार नाही, असे धोरण केंद्र सरकार राबवले आहे, असेही पुरी यांनी सांगितले.

बिगर भाजपशासित राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलवर जास्त व्हॅट

विरोधी पक्षांवर टीका करताना पुरी म्हणाले की, "बिगर भाजप शासित राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्‍या किंमती अधिक आहेत. या राज्‍यांमध्‍ये भाजपशासित राज्यांपेक्षा जास्त व्हॅट आहे. त्‍यामुळे तेथे सर्वसामान्‍य नागरिकांना भुर्दंड बसत आहे."

कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण

गेल्या काही महिन्यांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण सुरूच आहे. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल १०० डॉलरवरून ७५ डॉलर प्रति बॅरल झाली आहे. मात्र, देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news