Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल दरवाढीनं सर्वसामान्यांना घाम फोडला; सात दिवसांत ४.८० रुपयांनी महागले

petrol diesel price
petrol diesel price

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

देशात मंगळवारी (दि.२९) पुन्हा पेट्रोल-डिझेल (Petrol Diesel Price Today) महागले. दिल्लीत पेट्रोल ८० पैसे आणि डिझेल ७० पैशांनी वाढले आहे. यामुळे राजधानी दिल्लीत पेट्रोल प्रति लिटर १०० रुपयांवर पोहचले आहे. तर डिझेल ९१.४७ रुपये झाले आहे. मुंबईत पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे ८५ आणि ७५ पैशांनी महागले आहे. मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर ११५ रुपयांवर पोहोचला आहे. डिझेल ९९.२५ रुपयांवर गेले आहे. तेल कंपन्यांनी गेल्या आठ दिवसांत सातव्यांदा इंधन दरवाढ केली आहे. यामुळे सात दिवसांत पेट्रोल-डिझेल ४.८० रुपयांनी महागले आहे.

१३७ दिवस दर स्थिर राहिल्यानंतर २२ मार्च रोजी पेट्रोल-डिझेल दरात ८० पैशांची वाढ झाली होती. त्यानंतर ही वाढ सुरुच आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आल्यानंतर तेल कंपन्यांकडून इंधन दरवाढीला सुरुवात करण्यात आली होती. तत्पुर्वी सुमारे साडेचार महिने इंधन दर स्थिर ठेवण्यात आले होते. रशिया आणि युक्रेन यांच्या दरम्यान सुरु असलेल्या युद्धामुळे जागतिक बाजारात क्रूड तेलाचे दर कडाडले आहेत. या दरवाढीमुळे इंधन दरवाढ (Petrol Diesel Price Today) करावी लागत असल्याचे तेल कंपन्यांचे म्हणणे आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news