मोदी सरकारची पेट्रोल दरवाढीची ‘शांतीत क्रांती’ ! फक्त ६ दिवसांत तब्बल ४ रुपये दरवाढ | पुढारी

मोदी सरकारची पेट्रोल दरवाढीची 'शांतीत क्रांती' ! फक्त ६ दिवसांत तब्बल ४ रुपये दरवाढ

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : पाच राज्यांतील निवडणुकांचे मतदान टप्प्यात असतानाच रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार हे सर्वश्रुत होतं. निवडणुका संपल्या अन् मागील मंगळवारपासून आजपर्यंत या ६ दिवसांत सलग ५ वेळा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. ही वाढ साधारणपणे प्रतिलीटर मागे ५० पैशांपासून ८५ पैशांपर्यंत होत दिसत आहे. मागील ६ दिवसांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात एकूण किती ४ रुपयांची वाढ झालेली आहे. (Petrol-diesel price)

दिल्लीत आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या प्रति लीटर किमतीमध्ये ८०-८० पैशांची दरवाढ झालेली आहे. तेल कंपन्यांनी गुरूवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग वाढ केलेली नव्हती. मात्र, शनिवारी पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलमध्ये वाढलेली ८० पैशांची वाढ झालेली आहे. सध्या आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्चे ११८.८७ प्रति बॅरेलवर दर पोहोचलेला आहे.

पेट्रोलच्या नव्या किमती

नवी दिल्ली : ९७.८१ प्रति लीटर

मुंबई शहर : ११२.५२ प्रति लीटर

कोलकाता : १०७.१८ प्रति लीटर

चेन्नई : १०३.६७ प्रति लीटर

डिझेलच्या नव्या किमती

आगरा : ८९.०८ प्रति लीटर

अहमदाबाद : ९१.६८ प्रति लीटर

बंगळुरू : ८७.३७ प्रति लीटर

दिल्ली : ८९.०७ प्रति लीटर

फरिदाबाद : ८९.८३ प्रति लीटर

…अशा तपासून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल-डिझेलच्या किमती

आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय बाजारात देशातील प्रत्येक दिवशी घरगुती तेलाच्या किमतीवर संशोधन केले जाते. त्यानंतर हे नवे दर सकाळी ६ वाजता लागू केले जातात. तुम्हीती तुमच्या शहरातील तेलाच्या किमती जाणून घेऊ शकता. तेलाच्या किमती जाणून घेण्यासाठी इंडियम ऑईल संदेश सेवा अंतर्गत ९२२४९९२२४९ या क्रमांकावर तुम्हाला संदेश पाठवावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या शहरातील किमती तुमच्या मोबाईलद्वारे संदेशाद्वारे कळेल. (Petrol-diesel price)

हे वाचलंत का? 

Back to top button