पुढारी ऑनलाईन डेस्क :
आपल्याकडे बिबट्याची दहशत आता नवी राहिली नाही. (Leopard attack) अनेक जिल्ह्यांमध्ये त्याचा वावर आणि धुमाकूळाबाबत तुम्ही आजवर वाचलं असेल आणि सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओमधून पाहिलंही असेल. असेच काहीसा थरार हरियाणातील पानिपत जिल्ह्यातील बेहरामपूर गावात पोलिस आणि वन विभागाच्या अधिकार्यांनी अनुभवला. या गावात जेरबंद करण्यासाठी गेलेल्या पथकावर बिबट्याने हल्ला केला. याचा व्हिडीओ सध्या साेशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
बेहरामपूर गावात बिबट्याचा वावर होता. त्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागासह पोलिसांचे पथक दाखल झाले. यावेळी बिबट्याला नजरेस पडला;पण बिथरलेल्या बिबट्याने या पथकातील एका पोलिस अधिकारी आणि दोन वन कर्मचार्यांवर हल्ला केला. या थरारानंतरही कर्मचार्यांनी अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळली. कोणतीही दुखापत न करता बिबट्याला जेरबंद केले.
पानिपतेचे पोलीस अधीक्षक शशांक कुमार सावन यांनी बिबट्याने केलेला हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. याबराेबरच त्यांनी म्हटलं आहे की, पोलिस आणि वन विभागासाठी आजचा दिवस कसोटीचा होता. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात काहीजण जखमी झाले; पण अधिकारी आणि कर्मचार्यांनी अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळली. त्यांच्या शुरपणा आणि धैर्याला सलाम. अखेर कोणतीही दुखापत न होता बिबट्या जेरबंद झाला. बिबट्याने हल्ला केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलीस आणि वन विभागाच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
हेही वाचा :