पुणे शहरात पालख्यांचे ऑनलाईन ट्रॅकिंग…

पुणे शहरात पालख्यांचे ऑनलाईन ट्रॅकिंग…

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पोलिसांकडून संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुणे शहरात ऑनलाईन ट्रॅकिंग केले जाणार आहे. टि्वटरच्या माध्यमातून या पालख्या कोठे आहेत हे देखील लाईव्ह दिसणार आहे. दरम्यान रस्ते अगोदच बंद करण्यायावरून वाहतूक पोलिस रस्त्यावरील वाहतुकीचे नियोजन करणार आहेत. नागरिकांना त्रास होणार नाही आणि पालखीला अडथळा येणार नाही, अशा दृष्टीनो नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त विजय मगर यांनी दिली.

बुधवारी (दि. 7) मगर यांनी त्यांच्या कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या 12 जून रोजी पुण्यात दाखल होत आहेत. त्यासाठी वाहतूक पोलिसांकडून नियोजन केले जात आहे. पालखी मार्गावर योग्य वाहतूक बंदोबस्ताचे नियोजन केले जात आहे. या वर्षी वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी 'माय सेफ अ‍ॅप' च्या माध्यमातून पालख्या ऑनलाईन ट्रॅकिंग केल्या जाणार आहेत.

पालख्यांचे लोकेशन समजणार असल्यामुळे थेट नियंत्रण कक्षातून रस्ते बंद करण्याचे नियोजन केले जाणार आहे. तसेच, पालख्याचे लाईव्ह लोकेशनची माहिती नागरिकांना टि्वटरवरून दिली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना देखील पालखी कुठे आहे याची माहिती मिळणार आहे. पालखी मार्गावरील अंतर्गत रस्ते लवकरच बंद केल्यामुळे अडचणी येतात. पण, या वेळी पालख्या जवळ आल्यानंतर रस्ते बंद केले जाणार आहेत. तसेच, महत्त्वाच्या चौकात रोपच्या साहाय्याने रस्ता बंद केला जाईल.

वाहनांची गर्दी झाल्यास त्यांना रोप काढून रस्ता ओलांडण्यास मदत केली जाणार आहे. नागिरकांचे हाल होणार नाहीत याची दक्षता घेतली जाणार आहे. पण, पालखी मार्गाला अडथळा निर्माण होईल अशी वाहतूक सुरू ठेवली जाणार नाही. तसेच, काही महत्वाच्या ठिकाणी अनाउन्सिंग सिस्टम ठेवली जाणार आहे, असे मगर यांनी सांगितले.

एक हजार वाहतूक पोलिस तैनात

पालखी मार्गावर एक हजार वाहतूक पोलिसांचे बंदोबस्त राहणार आहे. त्यामध्ये 975 कर्मचारी व 60 अधिकार्‍यांचा समावेश असणार आहे. प्रत्येक महत्वाच्या चौकात वाहतूक पोलिस तैनात राहणार आहेत. वाहतूक पोलिस स्थानिक पोलिसांची मदत घेणार आहेत. त्या दृष्टीने स्थानिक पोलिसांना देखील सूचना करण्यात आल्या आहेत. रस्ते बंद करताना नियंत्रण कक्षाला कळवूनच ते बंद केले जाणार आहेत, असे उपायुक्त विजय मगर यांनी सांगितले.

मेट्रोचे काम 12 जून पर्यंत बंद

शिवाजीनगर येथे मेट्रोचे काम सुरू आहेत. पालख्या येत असल्यामुळे शिवाजीनगर परिसरातील मेट्रोची कामे 7 ते 12 जून दरम्यान बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार मेट्रोने आजपासून काम बंद केले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news