Pakistan’s Reaction on Chandrayan 3 : ‘भारताकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या’; चांद्रयान 3 च्या यशाबद्दल पाकिस्तानकडून तोंडभरून कौतुक

Pakistan's Reaction on Chandrayan 3
Pakistan's Reaction on Chandrayan 3
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : Pakistan's Reaction on Chandrayan 3 : भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेच्या यशाबद्दल भारताचे शेजारील राष्ट्र पाकिस्तानने विलंबाने का होईना पण भारताचे कौतुक केले आहे. पाकिस्तानने म्हटले आहे की, चांद्रयान 3 मोहिमेचे यश हे महान वैज्ञानिक यश आहे. यासाठी इस्रोचे शास्त्रज्ञ कौतुकास पात्र आहेत. तर देशातील प्रमुख दैनिकांनी कमी बजेटमध्ये ही कामगिरी केल्याबद्दल भारताचे कौतुक केले आहे. तर पाकिस्तानच्या वृत्तपत्रांनी भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेच्या यशाला मोठे कव्हरेज दिले आहे. तसेच भारताकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या, असेही म्हटले आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच यांना शुक्रवारी त्यांच्या ब्रिफिंग दरम्यान चांद्रयान 3 मोहिमेच्या यशस्वी सॉफ्ट लँडिगबद्दल भाष्य करण्यास सांगितले होते. यावेळी त्या म्हणाल्या की मी फक्त एवढेच म्हणू शकते की ही एक मोठी वैज्ञानिक कामगिरी आहे. ज्यासाठी इस्रोचे शास्त्रज्ञ कौतुकास पात्र आहेत.

Pakistan's Reaction on Chandrayan 3 : पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांकडून पहिल्या पानावर कव्हरेज

द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या माहितीनुसार, पाकिस्तानने आतापर्यंत भारताच्या ऐतिहासिक यशाकडे अधिकृतपणे दुर्लक्ष केले होते. बुधवारी झालेल्या ऐतिहासिक घटनेला प्रसारमाध्यमांनी मात्र पहिल्या पानावर कव्हरेज दिले आहे.

Pakistan's Reaction on Chandrayan 3 : भारताकडून शिकायला हवे – द डॉन

द डॉनने म्हटले आहे की, श्रीमंत राष्ट्रांनी मोठ्या प्रमाणात खर्च करून जे साध्य केले आहे ते भारताने अतिशय कमी बजेटमध्ये साध्य केले आहे. त्यामुळे ही विशिष्ट कामगिरी कौतुकास पात्र आहे. द डॉनमध्ये पुढे म्हटले आहे की, अशी कठीण मोहीम शक्य करण्यासाठी सरकारच्या पाठिंब्या व्यतिरिक्त अभियंते तसेच शास्त्रज्ञांची गुणवत्ता आणि समर्पण ही भारताच्या अंतराळ कार्यक्रमाच्या यशाची गुरुकिल्ली आहे.

द डॉनने असेही म्हटले आहे की पाकिस्तानच्या अंतराळ कार्यक्रमाशी याची तुलना करणे खरोखरच घृणास्पद आहे. मात्र, भारताच्या अंतराळ यशातून पाकिस्तानला अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. पाकिस्तानचा अंतराळ कार्यक्रम भारताच्या आधी लॉन्च करण्यात आला होता आणि त्याला माफक यश मिळाले," असे त्यात म्हटले आहे.

Pakistan's Reaction on Chandrayan 3 : यूएस, रशिया आणि चीनलाही मागे टाकले – एक्सप्रेस ट्रिब्यून वृत्तपत्र

पाकिस्तानच्या एक्सप्रेस ट्रिब्यून वृत्तपत्राने इंडियाज लूनर लॉरेल या संपादकीयात चांद्रयान 3 मोहिमेविषयी म्हटले आहे की, भारताच्या या महत्वाकांक्षी उड्डाणाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यासाठी यूएस, सोव्हिएत रशिया आणि चिनी अंतराळ कार्यक्रमाला देखील मागे सोडले.

तसेच चांद्रयान 3 ही आतापर्यंतची सर्वात किफायतशीर चांद्र मोहीम आहे. चांद्रयान 2 मोहिमेचा खर्च 117 USD दशलक्ष डॉलर होता या तुलनेत चांद्रयान 3 फक्त USD 75-90 दशलक्ष इतकी आहे. (Pakistan's Reaction on Chandrayan 3)

चांद्रयान 3 या मोहिमेचा हा खर्च उन्हाळ्यातील चित्रपटांपेक्षा देखील खूपच कमी असतो. अवतार 2 ची किंमत USD 350 दशलक्ष आहे, RRR ची किंमत सुमारे USD 80 दशलक्ष आहे आणि नवीन इंडियाना जोन्स चित्रपटाला USD 100 बिलियन पेक्षा जास्त नुकसान अपेक्षित आहे, असे त्यात म्हटले आहे.

याशिवाय भारताचे कौतुक करणाऱ्यांमध्ये पाकिस्तानचे माजी माहिती मंत्री फवाद चौधरी यांचा देखील समावेश होता. ज्यांनी या कामगिरीबद्दल देशाचे कौतुक केले आहे. तसेच सोशल मीडियावर अनेक अनेक पाकिस्तानी लोकांनीही या कामगिरीबद्दल भारताचे अभिनंदन केले, तर इतर वापरकर्त्यांनी अंतराळ संशोधनातील पाकिस्तानच्या उदासीन कामगिरीवर टीका केली आणि 1961 मध्ये स्थापन केलेल्या स्पेस अँड अप्पर अॅटमॉस्फिअर रिसर्च कमिशन (SUPARCO) या त्याच्या स्पेस एजन्सीबद्दलही काही विनोदी विनोद केले. (Pakistan's Reaction on Chandrayan 3)

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news