कंगाल पाकिस्तानने मदतीसाठी पसरले ‘ड्रॅगन’समोर हात! लष्‍कर प्रमुख चार दिवसांच्‍या चीन दौर्‍यावर

कंगाल पाकिस्तानने मदतीसाठी पसरले ‘ड्रॅगन’समोर हात! लष्‍कर प्रमुख चार दिवसांच्‍या चीन दौर्‍यावर
Published on: 
Updated on: 

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : गंभीर आर्थिक संकटाने ग्रासलेला पाकिस्‍तान आता आर्थिक मदतीसाठी चीन समोर हात पसरले आहेत. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांचा चार दिवसांच्या चीन दौरा आजपासून सुरु झाला आहे. द्विपक्षीय संरक्षण संबंध वाढवणे, हे या दौर्‍याचा उद्देश असल्‍याचे सांगितले जात असले तरी आर्थिक संकटातून सावरण्‍यासाठी चीनने मदत करावी हा या दौर्‍याचा मुख्‍य हेतू असल्‍याचे मानले जात आहे.

असीम मुनीर यांनी नोव्‍हेंबर २०२२ मध्‍ये पाकिस्तान लष्कराची सूत्रे हाती घेतली होती. त्‍यानंतरच हा त्‍यांचा हा चौथा विदेश दौरा आहे.यापूर्वी मुनीर यांनी सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि युनायटेड किंगडमला अधिकृत भेटी दिल्या होत्या. जनरल मुनीर यांनी यूके दौऱ्यानंतर पुन्हा यूएईला भेट दिली होती. आता ते चीन दौर्‍यावर गेले असल्‍याची माहिती पाकिस्‍तान लष्‍कराच्‍या अधिकृत माध्‍यम विभागाने निवदेनाव्‍दारे याची माहिती दिली आहे.

द्विपक्षीय लष्करी संबंध वाढवण्यासाठी लष्‍कर प्रमुख चीनच्‍या दौर्‍यावर गेले असल्‍याचे पाकिस्‍तानच्‍या लष्‍कराने म्‍हटले आहे. मात्र, या भेटीच्या आर्थिक उद्दिष्टाबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. पाकिस्‍तानमधील नव्या लष्करप्रमुखाने नियुक्ती झाल्यानंतर काही आठवड्यांतच ते चीनला भेट देतात हे सामान्‍य आहे. मात्र यावेळीपाकिस्‍तानमधील आर्थिकस्‍थिती मोठ्या प्रमाणावर ढासळल्‍यामुळे मुनीर यांचा दौर्‍याला विलंब झाल्‍याचे सांगितले जात आहे.

पाकिस्‍तानला हवी आहे ६ अब्‍ज अमेरिकन डॉलर्सची मदत

पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या वाढत्या दबावादरम्यान मुनीर यांचा चीन दौरा पाकिस्‍तानसाठी अत्‍यंत महत्त्‍वाचा मानला जात आहे. आर्थिक संकटातून सावरण्‍यासाठी पाकिस्तानला किमान ६ अब्ज अमेरिकन डॉलर्सची गरज आहे. आतापर्यंत, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीने पाकिस्तानला 3 अब्ज अमेरिकन डॉलर्सची मदत देण्याची ग्‍वाही दिली आहे;परंतु आंतरराष्ट्रीय कर्जदाराने उर्वरित रकमेसाठी आश्वासन मागितले आहे. सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती व्यतिरिक्त चीन हा एकमेव देश आहे जो पाकिस्तानला महत्त्वपूर्ण मदत देतो असे मानले जाते.

राजकीय अराजकतेमुळे पाकिस्‍तानवरील आर्थिक संकट झाले गडद

राजकीय अराजकतेमुळे पाकिस्तानमधील आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे. एकीकडे पदच्युत पंतप्रधान इम्रान खान यांच्‍या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ) आणि दुसरीकडे सरकार आणि न्यायव्यवस्था यांच्यातील लढाईमुळे देशासमोरील आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे.

पाकिस्‍तान गंभीर आर्थिक संकटाने ग्रासला

पाकिस्तान गंभीर आर्थिक संकटाने ग्रासला आहे आणि उच्च बाह्य कर्ज, कमकुवत चलन आणि वाढत्या महागाईने त्रस्त आहे. पाकिस्तानच्या परकीय चलनाचा साठा चार अब्ज डॉलरवर घसरला आहे, असे देशाच्या केंद्रीय बँकेने गेल्या आठवड्यात सांगितले. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) सोबत अत्यंत आवश्यक असलेल्या बेलआउटसाठी बोलणी करत आहे परंतु तरीही त्यासाठी संघर्ष करत आहे. USD १.१ बिलियन बेलआउट पॅकेजचे उद्दिष्ट देशाला दिवाळखोर होण्यापासून रोखणे आहे. आता पाकिस्‍तान लष्‍करप्रमुखांचा चीन दौर्‍यातून पाकिस्‍तानला केवढी आर्थिक मदत होणार हे लवकरच स्‍पष्‍ट केले आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news