ऑपरेशन गंगा : परराष्ट्रमंत्री संसदेत निवेदन सादर करणार 

ऑपरेशन गंगा : परराष्ट्रमंत्री संसदेत निवेदन सादर करणार 

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात युक्रेनमधील युद्धक्षेत्रातून भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी केलेल्या बचाव मोहिमेवर, रशिया आणि युक्रेनमधील संघर्षाबाबत भारताची भूमिका, याविषयी निवेदन सादर करतील. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा १४ मार्च ते ८ एप्रिल या कालावधीत चालणार आहे.

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने २४ फेब्रुवारी रोजी ऑपरेशन गंगा सुरू केले. चार केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, हरदीप सिंग पुरी, ज्योतिरादित्य सिंधिया आणि जनरल व्हीके सिंग यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध देशांमध्ये बचावासाठीच्या प्रयत्नांमध्ये समन्वय साधण्यासाठी पाठवले होते.

आतापर्यंत, ८० हून अधिक विशेष विमान उड्डाणांद्वारे अडकलेल्या सुमारे २० हजार नागरिकांची सुटका करण्यात भारत यशस्वी झाला आहे. ऑपरेशन गंगाद्वारे, भारत बांगलादेश आणि नेपाळ सारख्या शेजारील देशांतील अनेक नागरिकांचीही सुटका करण्यात आली आहे. ऑपरेशन दरम्यान, बस आणि ट्रेनने भारतीयांना युक्रेनच्या पश्चिम सीमेवर आणले आणि त्यांना बुडापेस्ट, सुसेवा आणि वॉर्सा, बुखारेस्ट आदी ठिकाणांद्वारे भारतात परत आणण्यात आले. सुमीमधून बाहेर काढलेल्या ६०० हून अधिक विद्यार्थ्यांची शेवटची तुकडी पोलंडमार्गे भारतात परत आणण्यात आली.

हे वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news