पुढारी ऑनलाईन डेस्क: केंद्र सरकारने सोयाबीनपासून तयार झालेले पशुखाद्य आयात करण्याचा निर्णय मागील महिन्यात घेतल्यानंतर आता खुल्या बाजारातील सोयाबीनचे दर कोसळू लागले आहेत. जून आणि जुलै महिन्यात प्रतिक्विंटल १० हजार रुपयांवर गेलेला दर आता सहा हजार रुपयांवर आला आहे.
जून, जुलै महिन्यात सोयाबीनचे दर १० हजार रुपयांवर गेले होते.
परदेशात तयार होणाऱ्या ड्राय ऑईल केक आणि डीओएसी म्हणजे जनावरांना देण्यात येणारी पेंड तयार करण्यासासाठी सोयाबीनचा वापर केला जातो.
तसेच पोल्ट्रीत वापरले जाणारे कोंबड्यांचे खाद्यही सोयाबीनपासून तयार केले जाते.
त्यामुळे जून आणि जुलैमध्ये त्याला मागणी वाढली होती. परिणामी हा दर १० हजार रुपयांवर गेला होता.
ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन विकले नव्हते त्यांचा प्रचंड फायदा झाल्याने शेतकरी खूश होते.
मागील महिन्यात केंद्र सरकारने डीओसी आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर सोयाबीनचे दर उतरू लागले आहेत.
भारत सरकारने १२ लाख टन जनुकीय बदल केलेल्या सोयाबीन डीओसीच्या आयातीला दिली परवानगी दिली आहे.
मोदी सरकारच्या या निर्णयाचा देशातल्या सोयाबीन उत्पादकांना मोठा फटका बसला.
जुलैमध्ये १० हजार रुपये क्विंटलने विकले जाणारे सोयाबीनचे दर २ हजार रुपयांनी घसरले.
सध्या महाराष्ट्रात किमान ४०००-४२०० ते किमान ५००० ते ६१०० असा सोयाबीनला विविध जातीनुसार दर मिळत आहे
. सोयाबीन उत्पादन करण्यात देशात सध्या महाराष्ट्र महत्त्वाचे राज्य आहे.
महाराष्ट्रातील २८ जिल्ह्यांत सोयाबीनचे विक्रमी उत्पादन घेतले जाते. मध्यप्रदेश हे सोयाबीन उपादन करण्यात आघाडीचे राज्य आहे.
हेही वाचा: