Honey Trap : भारतात हनी ट्रॅप, पाकिस्तानकडून ‘शेरनी’ प्रोजेक्टमध्ये ३०० मुलींची भरती; भारतीय जवान ठरताहेत बळी

Honey Trap : भारतात हनी ट्रॅप, पाकिस्तानकडून ‘शेरनी’ प्रोजेक्टमध्ये ३०० मुलींची भरती; भारतीय जवान ठरताहेत बळी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय गुप्तचर विभागातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाकिस्तानने पुन्हा एकदा आपल्या नापाक हरकती करण्यास सुरूवात केली आहे. भारतात दहशतवादी पाठवूनही काही होत नसल्याने, पाकिस्ताने हेरगिरीसाठी महिला एजंटचा वापर करत, घाणेरड्या प्रकारे घुसखोरी सुरू केली आहे. याची शिकार हे भारतीय सैन्यातील जवान ठरत आहेत. अशा हनी ट्रॅपला भारतीय सैन्यातील जवान प्रदीपकुमार बळी पडल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. या भारतीय जवानाची चौकशी केल्यानंतर तो गेल्या अनेक दिवसांपासून या हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकल्याची माहिती मिळाली आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणा या जवानाची चौकशी करत असून यातून धक्कादायक प्रकार समोर येत आहेत.

पाकिस्तान भारताविरूद्ध हे एक षडयंत्र रचत आहे. महिलांच्या साह्याने दुश्मनाला आपल्या जाळ्यात ओढणे हा पाकिस्तानचा खूप जुना खेळ आहे. १९५० च्या दशकात भारताच्या एका डिप्लोमेटच्या बाबतीत हनी ट्रॅप झाल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांनी संबंधित अधिकाऱ्याची नोकरी वाचवली होती. सीनिअर रॉ ऑफिसर के. वी. उन्नीकृष्णन यांना पनामा एअरहोस्टेसने हनी ट्रॅपमध्ये ओढले होते, जी पुन्हा अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेची अधिकारी निघाली. म्हणजेच हा हनी ट्रॅपिंगचा खेळ भारतासाठी काही नवा नाही, असे आजपर्यंतचे अनेक किस्से आहेत. याप्रकारे पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताविरुद्ध संपूर्ण रणनितीने हनी ट्रॅपचा हा घाणेरडा खेळ सुरू केला आहे.

पाकिस्ताकडून जुन्याच युक्त्यांचा अवलंब

भारताविरुद्ध कट रचण्यासाठी पाकिस्तान पुन्हा आपले जुनेच डावपेच वापरत आहे. भारताने पाकिस्तानचे दहशतवादी प्लॅन हाणून पाडल्यानंतर पाकिस्तानने आता महिलांना हेरगिरीच्या कामाला लावले आहे. सध्या पाकिस्तानमध्ये 300 महिला हेरांची फौज उभी करण्यात आली आहे, ज्यांचे लक्ष्य भारतीय लष्कराचे जवान आहेत. या पाकिस्तानी महिला आणि मुली सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय जवानांना आपल्या जाळ्यात ओढत आहेत आणि काही जवानही यामध्ये खेचले जात आहेत.

भारतीय जवानांना पाकिस्तानच्या या कटावर संशय येऊ नये म्हणून, या हेरेगिरी करणाऱ्या पाकिस्तानी महिला सैनिकांच्या बरोबर फोनवर बोलतात. बॉलिवूडच्या गाण्यांवर व्हिडिओ रील्स बनवून त्यांना पाठवतात. त्यांच्यासोबत लग्नाचे नाटक करतात. तसेच हिंदू देवी-देवतांचे फोटो डीपीला लावतात आणि शेअरदेखील करतात. पाकिस्तानी हेराच्या जाळ्यात अडकलेल्या जवानाने हा धक्कादायक खुलासा केला आहे.

असा अडकला भारतीय जवान हनी ट्रॅपमध्ये

दिसायला सुंदर असणारी एक पाकिस्तानी महिला एजंट सोशल मीडियावर अनेक प्रकारचे रील बनवत होती. ती बॉलिवूड गाण्यांवर बनवलेली रील सैन्यातील सैनिकांना पाठवायची, जेणेकरून सैनिक तिच्यावर सहज फिदा होतील. तपास आणि चौकशी दरम्यान समोर आले आहे की, पाकिस्तानी महिला एजंट भारतीय जवानांना अडकवण्यासाठी एक नव्हे तर अनेक खोट्या नावांचा वापर करतात. या मुली प्रिया शर्मा, पायल शर्मा, हरलीन कौर, पूजा राजपूत अशी नावे लावून वावरतात. यातील एका पाकिस्तानी महिला गुप्तहेराने स्वत: मध्य प्रदेशची रहिवासी असल्याचे प्रदीप नावाच्या जवानाला सांगत, त्याच्याशी ती संवाद करत होती. तिने प्रदीपला दिल्लीत भेटून लग्न करण्याचे आश्वासनही दिले होते. मात्र त्याआधीच या महिला पाकिस्तानी एजंटचा खेळ आटोपला. यानंतर प्रदीपच्या हा प्रकार लक्षात आला. प्रदीपकुमार या फसवणुकीचा बळी ठरला असल्याचे त्याने भारतीय गुप्तचर यंत्रणेला सांगितले.

व्हिडिओ कॉल आणि चॅटद्वारे झाले संभाषण

सोशल मीडियावरील या दोघांच्या ओळखीनंतर दोघांनीही एकमेकांचा संपर्क नंबर शेअर केला. ६ महिन्यांपासून दोघे व्हॉट्सअॅप चॅट, व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलद्वारे बोलत होते. संभाषणादरम्यान प्रदीपने त्याच्या कार्यालयातून लष्कराशी संबंधित गुप्त माहिती संबंधित महिलेला दिली होती. गोपनीय कागदपत्रांचे फोटोही व्हॉट्सअॅपवरून या महिलेला त्याने पाठवले होते. एवढेच नाही तर, आरोपीने स्वतःचे सीमही पाकिस्तानी महिला एजंटला पाठवले होते. त्याने त्याच्याकडे आलेले अनेक ओटीपीही शेअर केले होते. पाकिस्तानी महिला हेरांच्या निशाण्यावर भारतीय लष्कराचे अनेक सैनिक होते. मात्र प्रदीप त्याचा बळी ठरला. सध्या सुरक्षा यंत्रणा प्रदीपची सतत चौकशी करत आहेत, जेणेकरून पाकिस्तानचा हा हनी ट्रॅप कट पूर्णपणे उघडकीस येईल.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news