कांदादरातील सतत होणारी घसरण थांबवण्यासाठी आणि कांदा निर्यातीस चालना देण्यासाठी वाणिज्य व उद्योगमंत्री ना. पियुष गोयल, कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, परराष्ट व्यवहार मंत्री एस. जयशंकर, आरोग्य आणि कुटूंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती पवार, कृषी, शेतकरी कल्याण राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांना निवेदन देण्यात आले आहे. – सुवर्णा जगताप, सभापती, लासलगाव बाजार समिती.