कोल्हापुरात ओमायक्रॉनचा आणखी एक रुग्ण, आरोग्य यंत्रणा सतर्क

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on
Updated on

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर जिल्ह्यात आणखी एक ओमायक्रॉन रूग्ण सापडला आहे. हा रुग्ण ५७ वर्षीय पुरुष असून तो नागाळा पार्क परिसरातील रहिवाशी आहे. त्याने कोणताही प्रवास केलेला नाही. एका कार्यक्रम सोहळ्यासाठी त्यांची मुलगी गोव्याहून आली आहे. यातून त्यांना लागण झाली असल्याची शक्यता आरोग्य प्रशासनाने व्यक्त केली आहे.

तसेच संबंधित व्यक्ती एका कार्यक्रम सोहळ्यासाठी गेले होते. तेथे त्यांना ओमायक्रॉनची लागणी झाली असल्याचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जिल्ह्यातील हा दुसरा रुग्ण आहे. पहिल्या ओमायक्रॉनबाधित रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

दरम्यान, अवघ्या आठवड्यात कोरोना उपचार घेणार्‍या रुग्णांच्या संख्येने देशात 1 लाखाचा टप्पा पार केला आहे. महाराष्ट्रात या रुग्णसंख्येची 40 हजारांकडे वाटचाल सुरू झाली आहे आणि कोल्हापुरात कोरोना रुग्णसंख्येने पुन्हा एकदा शंभरी गाठली आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : Omicron Corona जाणून घ्या सर्व माहिती? डॉ. रमण गंगाखेडकर | All you need to know about Omicron Corona

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news