Lalbaugcha Raja 2023 : ‘लालबागच्या राजा’च्या चरणी कोट्यवधींच्या सोन्या-चांदीचे दान; ५ काेटी १६ लाख राेख अर्पण

lalbaugcha raja
lalbaugcha raja

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  गणेशोत्सवात मुंबईतील 'लालबागच्या राजा' Lalbaugcha Raja 2023 च्या चरणी अडीच कोटींच्या सोने आणि चांदीच्या वस्तूंचे दान अर्पण केले आहे. यासोबतच ५ कोटी, सोळा लाख इतकी रोख रक्कम या भाविकांनी अर्पण केली आहे. एका भाविकाने ई-दुचाकी देखील राजाच्या चरणी अर्पण केली आहे. या वस्तूंचा 'लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा'तर्फे लिलाव करण्यात आला.

देशात गणेशोत्सव उत्साहात साजरा झाला. गणेशोत्सवात जगभरातून 'लालबागच्या राजा' Lalbaugcha Raja 2023 च्या दर्शनासाठी भाविक आले होते. सर्व चांदी आणि सोन्याच्या वस्तूंचा जाहीर लिलाव 'लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळा'तर्फे करण्यात आला. यातील एकेका वस्तूसाठी लाखोंची बोली लावण्यात आली. या वेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हा सर्व पैसा लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांसाठी खर्च करण्यात येतो.

दानातील महत्त्वाच्या वस्तू

सोने : गणपतीला Lalbaugcha Raja 2023 साडेतीन किलोच्या सोन्याच्या वस्तू अर्पण करण्यात आल्या. यात मुकुट, झुंबर, छत्री, जास्वंदी हार, अंगठी, चैन, बांगडी, गणेशमूर्ती, इमारतीची प्रतिकृती, उंदीर यांचा समावेश आहे.

चांदी : Lalbaugcha Raja 2023  ६४ किलो चांदीच्या वस्तू अर्पण करण्यात आल्या आहेत. यामध्ये चांदीचा पाट, भव्य मोदक, गणेशमूर्ती, छत्री, मुकुट, केळीचे पान, चांदीच्या केळी आणि प्रसाद, नारळ, कलश, घंगाळे, समई, जास्वंदीचे फूल अशा अनेक वस्तूंचा समावेश आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news