Odi World Cup 2023 : वनडे विश्वचषकापूर्वी ‘बीसीसीआय’ देणार खेळाडूंच्या फिटनेसवर लक्ष

Odi World Cup 2023 : वनडे विश्वचषकापूर्वी ‘बीसीसीआय’ देणार खेळाडूंच्या फिटनेसवर लक्ष

मुंबई; पुढारी ऑनलाईन : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या वर्षी भारतातच होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकासाठी कंबर कसली आहे. रविवारी बोर्डाने घेतलेल्या आढावा बैठकीत खेळाडुंच्या फिटनेस बाबतीत काही कठोर निर्णय घेतले. ज्याचा परिणाम आगामी 'आयपीएल' स्पर्धेत सुद्धा पाहण्यास मिळणार आहे. (Odi World Cup 2023)

आज झालेल्‍या 'बीसीसीआय'च्‍या बैठकीत मंडळाचे सचिव जय शाह यांच्यासह भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा, मुख्य संघ निवडकर्ते चेतन शर्मा आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण उपस्थित होते. 'बीसीसीआय'चे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी व्हिड[ओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीत सहभाग घेतला. (Odi World Cup 2023)

मागील काही मोठ्या स्पर्धेतमध्ये टीम इंडियाने केलेल्या कामगिरीवर बीसीसीआय समाधानी नाही. यामुळे आगामी होणाऱ्या मोठ्या स्पर्धांच्या तयारी करताना कोणत्या कमतरता राहू नये, यासाठी 'बीसीसीआय'ने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी रविवारी झालेल्या बैठकीत विश्वचषकासाठी संघात स्थान मिळविणाऱ्या खेळाडूंवर विशेष लक्ष ठेवण्याची जबाबदारी 'एनसीए'वर सोपविण्यात आली आहे. (Odi World Cup 2023)

या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जय शाह यांनी सांगितले की, इंडियन प्रिमीयर लीगच्या दरम्यान फ्रॅन्चाईजी संघासोबत महत्त्वाच्या खेळाडूंच्या फिटनेसवर 'एनसीए' काम करेल. एप्रिल ते मे दरम्यान 'आयपीएल'चे आयोजन केले जाणार आहे. ऑक्टोबरमध्ये एकदिवसीय विश्वचषकाचे भारतात आयोजन केले जाणार आहे. मागील एक वर्षात जसप्रीत बुमराह, दीपक चहर आणि रवींद्र जडेजा सारख्या महत्त्वाच्या खेळाडूंना अनेकवेळा दुखापतग्रस्त झाले आहेत. तसेच अद्याप अशा दुखापतीमधून ते बाहेर येण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

अशा महत्त्वाच्या खेळाडुंच्या दुखापतीमुळे संघावर मोठा परिणाम झाल्याचे पहायला मिळाले. अशा खेळाडुंच्या अनुपस्थितीमुळे महत्त्वांच्या स्पर्धेत भारतीय संघास खराब कामगिरीला फटका बसला आहे. यावेळी जय शाह म्हणाले, खेळाडुंच्या निवडीवेळी यो-यो टेस्ट आणि डेक्सा स्कॅन सारख्या प्रक्रियेमधून खेळाडुंना जावे लागणार आहे. त्यामुळे खेळाडूंच्या फिटनेसवर अधिकभर देण्यावर 'बीसीसीआय'ने लक्ष केंद्रीत केले आहे.

अधिक वाचा :

logo
Pudhari News
pudhari.news