पुढारी ऑनलाईन डेस्क : किया (Kia) ऑटोमोबाईल कंपनीने त्यांच्या पहिल्या 7-सीटर इलेक्ट्रिक SUV कारचे टिझर लॉन्च केले आहे. ही नवी कार आकर्षक फिचर्ससह, एका चार्जवर 483 किलोमीटरची रेंज देते. किया ईव्ही कन्सेप्ट (Kia EV9 Concept) असे या कारचे नाव आहे. किया या कोरियन ऑटोमेकर कंपनीने या कारचे टीझर नुकतेच रिलीज केले आहे.
2023 च्या ऑटो एक्सपोमध्ये या नव्या कारचे अनावरण केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Kia EV9 या नव्या 7-सीटर इलेक्ट्रिक SUV चे 2023 च्या शेवटी किंवा 2024 मध्ये बाजारपेठेत लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे.
Kia EV9 Concept आकर्षक अशा फ्रंट ग्रिलसह येऊ शकते. नवीन एअर व्हेंट डिझाइन मिळू शकते. हूड व्हेंट डक्ट एरिया सोलर पॅनल म्हणून वापरता येतो. मागे घेता येण्याऱ्या छताचे रेल असे फिचर देखील यामध्ये असेल. या टीझर दरम्यान दिसून आले. छताचे हे रेल बटणाच्या मदतीने चालू किंवा बंद केले जाऊ शकते.
EV9 कन्सेप्ट ही कार कियाच्या EV6 क्रॉसओवर या इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. Kia चे ग्लोबल मॉड्युलर प्लॅटफॉर्म (e-GMP) हे प्रगत तंत्रज्ञान त्यांच्या सर्व नवीनतम जनरेशनच्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी वापरले जाते. EV9 Concept ची लांबी सुमारे 5 मीटर असेल. तसेच रुंदी 2,055 मिमी, उंची 1,790 मिमी आणि 3,100 मिमीचा व्हीलबेस असेल.
Kia EV9 च्या केबिनमध्ये इंन्फोटेनमेंट टचस्क्रीन आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह सिंगल-पीस ट्विन-स्क्रीन लेआउट असेल. यात फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग व्हील, अॅम्बियंट लाइटिंग आणि मोठे पॅनोरामिक सनरूफ यांसारखे फिचर्स असतील.
हेही वाचा