पुढारी ८४ वा वर्धापन दिन स्नेहमेळावा : क्षणचित्रे (फोटो)

पुढारी ८४ वा वर्धापन दिन स्नेहमेळावा : क्षणचित्रे (फोटो)

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : नि:पक्ष व निर्भीड विचारांचा देदीप्यमान कृतिशील वारसा जपत गेली 84 वर्षे वाचकांच्या भरभक्कम साथीने वाटचाल करणारा दैनिक 'पुढारी' रविवारी (दि.1) पंच्याऐंशीव्या वर्षात पदार्पण करत आहे. वाचकांशी आपुलकी आणि जिव्हाळ्याच्या अतूट नात्याची वीण आणखी घट्ट करत दै. 'पुढारी'चा रविवारी वर्धापन दिन साजरा होत आहे. यानिमित्त 'पुढारी'च्या मुख्य कार्यालयासमोरील टाऊन हॉल बागेत सायंकाळी 5 ते 8 या वेळेत स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे.

कोल्हापूरकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या दै. 'पुढारी'चा वर्धापन दिनाचा सोहळा म्हणजे तमाम कोल्हापूरकरांसाठी कौटुंबिक सोहळाच आहे. या सोहळ्यासाठी ऐतिहासिक टाऊन हॉल परिसर नयनमनोहारी रोषणाईने सजवण्यात आला आहे. आकर्षक सजावट, भव्य व्यासपीठ, गालिचाने आच्छादलेला प्रवेश मार्ग, स्वागत कमान आणि त्याला सुसंगत अशा विविध रंगांची उधळण करणारी प्रकाश योजना यामुळे गर्द हिरवाईने नटलेल्या या बागेचे सौंदर्य आणखी खुलले आहे. स्वातंत्र्य लढ्यातील भागीदार आणि साक्षीदार असलेल्या दै. 'पुढारी'च्या भाऊसिंगजी रोडवरील मुख्य कार्यालयाच्या इमारतीला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आकर्षक तिरंगी रोषणाई करण्यात आली आहे. यामुळे भाऊसिंगजी रोडवरील सारा परिसर सजला आहे.

पुढारी ८४ वा वर्धापन दिन स्नेहमेळावा : क्षणचित्रे (फोटो)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news