October Heat : देशात जाणवणार ‘ऑक्टोबर हीट’; हवामान विभागाचा अंदाज

October Heat : देशात जाणवणार ‘ऑक्टोबर हीट’; हवामान विभागाचा अंदाज

पुणे; पुढारी वृत्तसेवा : देशाच्या सर्वच भागांत ऑक्टोबर महिन्यात कमाल तापमानात सरासरीपेक्षा जास्त वाढ होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. विशेषत: पूर्व किनारपट्टी, ईशान्येसह पूर्व भारत आणि दिल्ली परिसरात उन्हाचे चटके बसण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, सध्या मान्सूनचा देशाच्या विविध भागांतून परतीचा प्रवास सुरू झाला आहे. कोकण वगळता राज्यातून गुरुवारपर्यंत मोसमी पाऊस माघारी परतण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हवेतील आर्द्रता कमी होऊन वातावरण कोरडे राहण्याचा अंदाज आहे. परिणामी, राज्यासह देशभरात कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. देशभरात ऑक्टोबर महिन्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. मराठवाडा, विदर्भ, पूर्व किनारपट्टीवरील राज्ये, ईशान्य भारतासह पूर्वेकडील राज्ये आणि दिल्ली परिसरात कमाल तापमानात सरासरीपेक्षा जास्त वाढ होण्याचा अंदाज आहे.

तापमानवाढ कशामुळे?

भारतीय हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे म्हणाले, 'सूर्य 21 सप्टेंबर रोजी विषुववृत्तावर येतो. सूर्याला विषुववृत्त ओलांडून जाण्यासाठी 45 दिवसांचा काळ लागतो. या काळात संपूर्ण भारतीय उपखंडात सूर्याची उष्णता जास्त मिळते. मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे आकाश निरभ्र होते. आर्द्रतेचे प्रमाण कमी होते. त्यामुळे सूर्यप्रकाश थेट जमिनीवर येतो. त्यामुळे कमाल तापमानात वाढ होत आहे.'

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news