Kirit Somaiya : अनिल परबांनी आता कपड्यांची बॅग तयार ठेवावी : किरीट सोमय्या

Kirit Somaiya
Kirit Somaiya

पुढारी ऑनलाईन :
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर ईडीची कारवाई सुरू झाली आहे. त्यामुळे अनिल परबांनी आता आपल्या कपड्यांची बॅग तयार ठेवावी, असे विधान भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आज केले. शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानावर आज सकाळी 'ईडी'ने छापे टाकले.

अनिल परबांवर झालेल्या कारवाईवर किरीट सोमय्या म्हणाले, सध्या अनिल देशमुख, मंत्री नवाब मलिक हे तुरुंगात आहेत. ईडीकडून त्यांच्याकडे मनी लॉड्रींगप्रकरणी चौकशी सुरू आहे. बेनामी मालमत्ता, मनी लाँड्रिंग, शेल कंपन्या, पर्यावरण मंत्रालय, FEMA उल्लंघनासाठी ठाकरे सरकारच्या घोटाळेबाजांवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

यशवंत जाधव यांच्याही दुबई कनेक्शनची चौकशी व्हावी. तसेच यशवंत जाधव, हसन मुश्रीफ यांची कंपनी मंत्रालय ROC, आयकर, पर्यावरण मंत्रालय, ED, FEMA द्वारा चौकशी करावी, अशी मागणीही किरीट सोमय्या यांनी केली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news