Nora Fatehi Lifestyle: कोटींचं घर, ७ लाखांची पर्स; नोराची रॉयल लाईफ

nora fatehi
nora fatehi

पुढारी ऑनलाईन डेस्क : नोरा फतेही एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे. (Nora Fatehi Lifestyle) ती तिच्या अभिनयापेक्षा तिच्या डान्समुळे जास्त चर्चेत असते. मूळची कॅनडाची असलेल्या नोरा फतेहीने मायानगरीत खूप नाव कमावले आहे. नोराची लाईफस्टाइलही लक्झरी आहे. ती नेहमी आपल्या चाहत्यांना आपले अपडेट देत असते. मग तो कार्यक्रम असो, गाणे असो वा फोटोज, व्हिडिओज. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. तुम्हाला माहितीये का, नोराकडे किती संपत्ती आहे. तिच्या रॉयल लाईफ विषयी जाणून घेऊया. (Nora Fatehi Lifestyle)

नोरा फतेहीचे मुंबईत आलिशान घर आहे. सुमारे १० कोटी किमतीच्या या घराचे इंटीरियर पीटर मारिनो यांनी डिझाईन केले आहे. नोरा फतेहीकडे लक्झरी व्हॅनिटी व्हॅनही आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या व्हॅनची किंमत सुमारे ५ कोटी रुपये आहे.

नोरा फतेहीला हँडबॅग्जची खूप आवड आहे. ती ७ लाख रुपये किमतीची Herme Birkins बॅग घेऊन जाताना अनेकदा दिसली आहे. याशिवाय ती लुई व्हिटॉन बॅगसोबत दिसली आहे. या बॅगांची किंमत सुमारे पाच लाख रुपये आहे.

नोरा फतेही आज एवढी आलिशान लाईफ जगते. पण हे तिच्या कष्टाचे फळ आहे. स्ट्रगलिंग डेजमध्ये तिला संघर्ष करावा लागला आहे. तिला भारतात प्रस्थापित होण्यासाठी खूप अडचणी आल्याचे सांगितले जाते.

नोरा फतेहीने स्वतः मुलाखतीमध्ये सांगितले आहे की, ती कॅनडातून फक्त ५ हजार रुपये घेऊन भारतात आली होती. आपल्या मेहनती आणि कलेच्या जोरावर नोरा आज सुमारे ३० कोटी रुपयांच्या मालमत्तेची मालकीन आहे.

नोरा एका चित्रपटासाठी १ कोटी रुपये खर्च करते. नोराने दिल्लीमध्ये एक लक्झरी हाऊस खरेदी केलं आहे. तिची वेगवेगळ्या देशांमध्ये संपत्ती देखील आहे. नोराकडे सुंदर कार कलेक्शन आहेत. जगातील उत्तम गाड्यांची ती मालकीन आहे. नोराने बीएमडब्लू ५ सीरीज कार खरेदी केली होती.

तिची अधिक कमाई ब्रँड एंडोर्समेंटने होते. ब्रँड एंडोर्समेंट्स, स्टेज शो आणि स्वत:चा मेकअप ब्रँड Kay मधून ती पैसा कमवते. नोराने रिअल इस्टेट कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूकदेखील केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news