No Lungi-No Nigties: ‘नो लुंगी, नो नाईटी’ नाेएडामधील साेसायटीच्‍या ‘ड्रेस कोड’ची साेशल मीडियावर चर्चा

'नो लुंगी, नो नाईटी'
'नो लुंगी, नो नाईटी'

पुढारी ऑनलाईन: नोएडातील एका हाउसिंग सोसायटीत अजब नियम लागू केला आहे. सोसायटीत राहणाऱ्या लोकांसाठी सोसायटीच्या आवारात वावरताना 'नो लुंगी, नो नाईटी' अशी सूचना जारी करण्यात आली आहे. सोसायटीच्या वेलफेअर संघनेकडून १० जून रोजी ही नोटीस जारी केली आहे. या अजब ड्रेस कोड नियमासंदर्भात (No Lungi-No Nigties) सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

यूपीतील नोएडामधील एका सोसायटीच्या रहिवाशांच्या कल्याणकारी संघटनेने (RWA) हा अनोखा नियम जारी केला आहे. येथील पुरूष रहिवाशांना सोसायटीच्या परिसरात आणि सोसायटी पार्किंगमध्ये वावरताना त्यांच्या पोशाखाकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. आपली लहान मुले ही आपलेच अनुकरण करतात. त्यामुळे येथील पुरूष आणि स्त्री रहिवाशांनी फ्लॅटमध्ये घातले जाणारे लुंगी आणि नाईटी हे पोशाख सोसायटी बाहेर घालू नयेत.तसेच या पोशाखात सोसायटीच्या परिसरात फिरण्यास बंदी (No Lungi-No Nigties) देखील घालण्यात आली आहे, यासंदर्भातील माहिती 'एएनआय'ने दिली आहे.

नोएडामधील हिमसागर सोसायटीच्या नियमावलीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून, काही नेटकऱ्यांकडून याला कडाडून विरोध देखील केला जात आहे. तर काही नेटकऱ्यांनी ही लोकांची वैयक्तीक आवड असल्याची म्हणत सोसायटीच्या नियमावर टीका (No Lungi-No Nigties)  केली आहे.

योग्य तो पोशाखाने एकमेकांचा आदर केला पाहिजे- रहिवाशी अभिषेक

सोसायटीकडून घेण्यात आलेला हा चांगला निर्णय असून, सर्वांनी त्याचा आदर केला पाहिजे. यामध्ये विरोध करण्यासारखे काही नाही. जर स्त्रिया नाईटी घालून फिरत असतील तर पुरुषांना याेग्‍य वाटणार नाही. पुरुषांनी देखील सोसायटी परिसरात लुंगी घालून फिरल्यास महिलांनाही विचित्र वाटू शकते, त्यामुळे योग्य तो पोशाख परिधान करून आपण एकमेकांचा आदर केला पाहिजे, असे मत या सोसायटीतील रहिवाशी अभिषेक या युवकाने मांडले.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news